आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला वीजबचतीचा संदेश

Spread the love

चिंचवड : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे स्थापनेपासूनच संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा संस्था कार्यक्रमात वीज, पाणी ही अनमोल असून त्याचा योग्य वापर करण्याबाबत अनेकवेळा बैठकीच्या प्रसंगी सूचना देतात. नुकतीच प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या उपस्थितीत प्राध्यापकांच्या झालेल्या बैठकीत दि.14 डिसेंबर राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन असून या दिवशी विद्यार्थ्यांना वीज बचतीचे महत्व कळावे यासाठी स्पर्धा स्वरुपात आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कल्पना प्रत्यक्षरूपी साकार करण्याच्या व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना केल्या होत्या.


14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्यात येतो. यादिवशी ऊर्जा बचतीचे महत्व पटवून देणे, ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टीने सर्वांगीन प्रयत्न, विकासाबाबत जनजागृती करणे या उद्देशाला अनुसरुन 14 डिसेंबर रोजी महाविद्यालयात मॉडेल, पोस्टर व रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यात पोस्टर स्पर्धेत अनुक्रमे रसना कांबळे व ग्रुप-टी.वाय.बीबीए (सी.ए.), दिव्या बिराजदार व गु्रप-एफ.वाय.बीबीए (सी.ए.) तर, मॉडेल स्पर्धेत ओंकार कुलकर्णी विजेते ठरले. स्पर्धेचे परिक्षण डॉ. मीनल भंडारी यांनी केले.

यावेळी उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी म्हणाल्या, अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. ते सर्वचजण अभिनंदास पात्र आहे. आपल्या मनातील कल्पना प्रत्यक्ष कृतीरुपी साकार केल्या आहेत. वीज बचत काळाचीच गरज असून प्रत्येकाने आपल्या घरातील कुटूंबीय, नातेवाईक, मित्रांना वीजेचा जास्तीचा वापर होत असल्याचे आपणास आढळून आल्यास त्यांना योग्य तेवढ्या वीजेचा वापर करण्यासाठी आवाहन करावे, अनावश्यक वीज वापर कसा टाळता येईल, यासाठी प्रत्येकाने सतत सजग राहिले पाहीजे व वीज बचतीचा संदेश दिला पाहिजे.

कार्यक्रमाची प्रस्तावना विभागाच्या केंद्र प्रमुख प्रा. हेमलता चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अमृता भंडारी यांनी तर, आभार प्रा. अश्लेशा देवळे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. स्नेहल वर्‍हाडी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!