क्रीडा व मनोरंजनदेश विदेश

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

Spread the love

दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत सुनावणी झाली. यामध्ये बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि नियम घालून परवानगी दिली आहे. तसेच हे प्रकरण पाच सदस्य खंडपीठाकडे जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील चार वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!