ताज्या घडामोडी
ढोलेवाडी येथे पाणंद रस्त्याचे भूमिपूजन.
शिराळा प्रतिनिधी
तालुक्यातील ढोलेवाडी व भटवाडी येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या प्रत्येकी 10 लाख रुपये अशा 20 लाख रुपये खर्चाच्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक बबन पाटील यांच्यासह स्थनिक नेते मंडळी, पदाधिकारी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.