ताज्या घडामोडी

झेप प्रतिष्ठानतर्फे “माणुसकीची ऊब” उपक्रमाची सांगता……!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

पालघर:- झेप प्रतिष्ठानतर्फे गेल्या ६ वर्षापासून माणुसकीची ऊब हा उपक्रम राबवला जातो या फक्त सर्कस रस्त्यावरची झोपलेल्या आणि थंडीने कुडकुडणारे लोकांना चादर वाटप केले जाते आतापर्यंत जवळपास तीन ते चार हजार लोकांना जे प्रतिष्ठान ने चादर वाटप केलेली आहे. त्यांचे अनुकरण करून भरपूर संस्था चादर वाटपाचे काम स्टेशन परिसरात आणि शहरातील विविध भागात करताना दिसतात म्हणून या वेळी झेप प्रतिष्ठानने ही मदत वाया जाऊ नये म्हणून माणुसकीची ऊब हा उपक्रम जव्हार आणि विक्रमगड येथील आदिवासी पाड्यातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना स्वेटर वाटप करून करण्याचे ठरवले.

पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि विक्रमगड या तालुक्यात अनेक वीट भट्ट्यांवर वीट मजूर काम करीत असतात. त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी साडेतीन ते चार वाजल्यापासूनच होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने आई आणि वडील या दोघांनाही वीट भट्टी वरती काम करावं लागतं आणि त्यातील बहुतांशी मजूर हे स्थलांतरित असतात. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही अशा प्रत्येक वीट भट्टी वरती राहत असतात. मूल जर मोठा असेल तर त्याला लहान मुलांची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे मुलं ही अंदाजे त्याच वेळेत सकाळी उठतात. जव्हार हे आधीच एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल जातो. निसर्गाच्या कुशीत आणि डोंगरांच्या मध्ये वसलेलं जव्हार शहरात आणि गावात थंडीच्या दिवशी तापमान जवळपास 7 ते 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत उतरते अशावेळी या गरीब मुलांच्या अंगावर कपडे असणं हेही त्यांच्या नशिबाचा एक मोठा भाग ठरतो. अशा या हालाखीच्या परिस्थितीत सर्वच मुलांना स्वेटर त्यांच्या पालकांना परवडत नसते. याची झेप प्रतिष्ठानला कल्पना आहे कारण गेल्या ५ वर्षापासून झेप ही आदिवासी पाड्यातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. म्हणून यावर्षी हे स्वेटर वाटप या वीट भट्टी वरील मुलांना देण्याचे ठरवले आणि जवळपास दोन वीटभट्टीवर तसेच सडक योजनेचे काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना आणि जवळच्या एका आदिवासी पाड्यातील कोगदे या गावात जवळपास दोनशे चाळीस स्वेटर चे वाटप केले. अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता झेप प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हा उपक्रम प्रत्येक वीटभट्टीवर राबवला आणि मुलांना नवीन वर्षाच एक गोड सरप्राइज दिले. सोबत मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या मुलांना देण्यात आलेल्या नवीन स्वेटर ची क्वालिटी अत्यंत चांगल्या प्रकारची निवडण्यात आली असून या मुलांना हे स्वेटर निदान दोन ते तीन वर्ष सहज वापरता येतील अशी माहिती प्रतिष्ठानचे विकास धनवडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!