ताज्या घडामोडी

रत्नागिरी काॅंग्रेस प्रभारी शहर अध्यक्षपदी साईराज(भरत) चव्हाण यांची निवड…….!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

रत्नागिरी :- नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक अँड गुलाबराव घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी काॅंग्रेस प्रभारी शहर अध्यक्षपदी साईराज चव्हाण यांची निवड करण्यात आली. साईराज स्वरसम्राट ऑर्केस्ट्राचे संस्थापक आणि लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारत जिल्हा कार्यकारिणी रत्नागिरीचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणारे व्यक्तिमत्त्व म्हणून साईराज चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. स्वराज्य प्रतिष्ठान, लांजा यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांत त्यांचा हिरीरीचा सहभाग असतो वॄध्दाश्रम,अनाथाश्रम, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर अशा विविध उपक्रमांतून त्यांनी शहरातील तरुण वर्गात आदराचे स्थान निर्माण केले आहे. साईराज चव्हाण यांच्या निवडी समयी‌ जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी आगाशे,सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर कादरी,मीडीया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,. संगमेश्वर अध्यक्ष दत्ताशेठ परकर, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, महिला तालुका अध्यक्ष रिझवाना शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस हुस्नबानु खलिफे, महाराष्ट्र सरचिटणीस रुपाली सावंत, उपस्थित होते.यावेळी साईराज मित्रमंडळाच्या वतीने पुजाताई‌ सावंत,सुशील विलणकर, आर्या शेट्ये, ज्येष्ठ गायक मिलिंद सावंत स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर आदींनी साईराज चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!