महाराष्ट्र

कलापिनी निर्मित मूकनाट्याने स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पटकावला मौनांतर करंडक

'सय सरी’ ला मिळाले सांघिक प्रथम पारितोषिक

Spread the love

पुणे : कलापिनी निर्मित मूकनाट्याने, मौनांतर मूकनाट्य स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा मौनांतर करंडक पटकावला. ‘सय सरी’ ला सांघिक प्रथम पारितोषिक मिळाले.

कलापिनी निर्मित “सय सरी” या मूकनाट्याला, मौनांतर मूकनाट्य स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सांघिक प्रथम पारितोषिक मिळाले. राज्य स्तरावर ही स्पर्धा घेतली जाते. यावर्षी कलापिनीच्या मूकनाट्याला सांघिक प्रथम, वेदांग महाजन याला अभिनय प्रथम आणि प्रतिक मेहता, अभिलाष भवार आणि प्रसाद वायकर यांना नेपथ्य प्रथम अशी तीन पारितोषिके मिळाली.

पारितोषिक वितरण समारंभाला ‘पावनखिंड’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते अजय पुरकर, सुश्रुत मंकणी, वाइड विन्ग्ज च्या पौर्णिमा मनोहर. स्पर्धा प्रमुख कुशल खोत, परीक्षक डॉ अजय जोशी, धीरज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील सदस्य अगदी रोजच्या कामात आनंद कसा मिळवतात हे प्रभावीपणे नाटकात मांडले होते.

पुण्यात गेली सात वर्षे ही स्पर्धा आयोजित केली जाते. मागील वर्षी कलापिनीच्या ‘शतपावली’ या मूकनाट्याने प्रथम पारितोषिक मिळवले होते. यावर्षी देखील संस्थेने घवघवीत यश मिळवले आहे. स्पर्धेत 15 संघांनी भाग घेतला होता. मूकनाट्यात वेदांग महाजन, संदीप मन्वरे आणि डॉ विनया केसकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिग्दर्शन सायली रौंधळ यांनी केले होते. लेखन खगेश जोशी आणि चेतन पंडित यांचे होते. पार्श्वसंगीत प्रणव केसकर आणि शार्दुल गद्रे यांचे होते. प्रकाश योजना स्वच्छंद गंदगे, चेतन पंडित आणि विनायक काळे यांची होती. नेपथ्य प्रतिक मेहता, अभिलाष भवार आणि प्रसाद वायकर यांनी केले. हरीश पाटील,अदिती आपटे, ह्रितिक पाटील, हेमंत आपटे, चैतन्य जोशी यांनी संयोजन केले. श्रीपाद बुरसे, प्रमोद शुक्ल यांनी व्यवस्थापन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!