ताज्या घडामोडी

पहूर नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांचा माणुसकी समूहाच्या वतीने सत्कार

Spread the love

जळगाव जिल्ह्या प्रतिनिधी फिरोज तडवी,
जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन येथे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांची नवनियुक्ती झाल्याने माणुसकी समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे याअगोदर भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते, माणुसकी समूह करीत असलेले सामाजिक कार्य जाणून घेतले, व माणुसकी समूहाचे मनोरुग्ण सेवा व बेवारस मृतदेहांचे अंत्यविधी,रक्तदान शिबिराचे हे कार्य खरोखर वाखानण्याजोगे आहे असे सांगितले..पहुर पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी दारू हातभट्ट्या उध्वस्त करण्यात येतील असे यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी सुमित पंडित, गजानन क्षीरसागर,आदी माणुसकी समूहातील सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!