ताज्या घडामोडी

अथर्व आनंद पाटील याची SSC-TECH एन्ट्री साठी SSB (Service Selection Board) अलहाबाद मधून निवड लेफ्टनंट पदासाठी निवड

Spread the love

खंडाळा प्रतिनिधी

अथर्वचे प्राथमिक  शिक्षण जि.प.शाळा, खंडाळा १ली ते ४थी व माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा ५वी.दादोजी कोंडदेव मिलिटरी स्कूल तासगांव इयत्ता ६वी ते १०वी. पुर्ण केले.शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मालवण, सिंधुदुर्ग येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पुर्ण केला.
डी वाय् पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आकू्र्डी,पूणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पुर्ण केली.त्याची नुकतीच SSC-TECH एन्ट्री साठी SSB (Service Selection Board) Alhadabad मधून निवड लेफ्टनंट पदासाठी निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल विलासराव कोळेकर, पत्रकार उदय महाकाळ, माजी मुख्याध्यापक प्रकाश वंजोळे,श्री माधव अंकलगे सर यांनी त्याचा शाल ,श्रीफळ देवून सत्कार केला. अथर्वला त्याचे वडील प्रा.आनंद पाटील व त्याच्या आईचे विशेष प्रोत्साहन मिळाले.
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!