अध्यात्मिकमहाराष्ट्रसामाजिक

हभप शेखर महाराज जांभुळकर, यांना लोकरत्न” या पुरस्काराने केले सन्मानित..

Spread the love

हभप शेखर महाराज जांभुळकर, यांना लोकरत्न” या पुरस्काराने केले सन्मानित..Habhap Shekhar Maharaj Jambhulkar was honored with the Lokratna.

आवाज न्यूज : मुळशी प्रतिनिधी, १३ ऑगष्ट.

हभप शेखर महाराज जांभुळकर, हिंजवडी (युवा कीर्तनकार) यांना आदरणीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त “लोकरत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात अगदी तरुणपणात कमी वयात, कमी काळात वारकरी संप्रदायामध्ये करत असलेल्या कार्याची विशेष दखल घेत हा सन्मान, कार्यगौरव करण्यात आला. शेखर महाराज हे अधिक मास पवित्र काळात काशी विश्वेश्वर आणि राम भूमी अयोध्या तीर्थयात्रेला असताना देखील हा पुरस्कार जाहीर करून तो स्विकारण्यासाठी आई वडिलांना घरी येऊन सस्नेह निमंत्रण दिले.

 

संप्रदायाच्या पुढील प्रचार, प्रसाराच्या वाटचालीला शुभेच्छा देत भाऊंनी महाराजांचा गुणगौरव केला त्याबद्दल आदरणीय  शंकर भाऊ मांडेकर (सदस्य, पुणे जिल्हा परिषद व अध्यक्ष, जिल्हा प्रमुख शिवसेना) यांच्याप्रती हभप शेखर महाराज / जांभूळकर परिवार आणि हिंजवडी ग्रामस्थ कृतज्ञता वक्त करत आहोत, त्यांच्या भावीवाटचालीला शुभेच्छा आणि संप्रदायाचा सेवेचा वसा वारसा चालवण्यासाठी पांडुरंग परमात्मा भाऊंना उदंड आयुष्य व आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!