आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

सांगिसे पुलावरून पाणी गेल्याने सांगिसे, वडिवळे,नेसावे, खांडशी बूधवडी या गावांचा तुटला संपर्क…

Spread the love

सांगिसे पुलावरून पाणी गेल्याने सांगिसे, वडिवळे,नेसावे, खांडशी बूधवडी या गावांचा तुटला संपर्क…

आवाज न्यूज कामशेत प्रतिनिधी १०|७|२०२२  

कामशेत वरून सांगिसे जाणा-या रस्त्यावर असणा-या सांगिसे पुलावरून पाणी गेले आहे सांगिसे पुलावरून पाणी गेल्याने सांगिसे, वडिवळे,नेसावे, खांडशी बूधवडी या गावांचा संपर्क तुटला आहे.

आजच्या पावसाने पुल पाण्याखाली गेला आहे जर पावसाचा जोर दोन तीन दिवस  अजून असाच राहिला तर पुलावरून पाणी जाण्याची पातळी वाढली तर या गावांचा संपर्क कामशेत शहराशी तुटणार आहे.गेली अनेक वर्ष या पुलावरून पाणी नेहमीच जात असते ह्या पुलाची दुरावस्था झाली आहे. पुलावरून पाणी जाणे हे दरवर्षी हे नित्याचेच झाले आहे दर निवडणुकीत राजकीय पक्ष   नवीन पूल बांधण्याचे आश्वासन देतात  निवडणूक झाल्यानंतर या कडे कोणी लक्ष देत नाहीत  या मुळे गेली अनेक वर्षे ह्या पुलाचे काम रखडले आहे लवकरात लवकर ह्या पुलाचे काम मार्गी लावावे अशी मागणी येथील नागरिकांची आहे.
फोटो सांगिसे येथील पुल पाण्याखाली गेला आहे
े.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!