आरोग्य व शिक्षण

पुणे हडपसर मांजरी येथील मातृछाया जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर, शिवणक्लास

Spread the love

पुणे हडपसर मांजरी येथील मातृछाया जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर, शिवणक्लास तिसरे प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषांना दिपप्रज्वलन करुन अभिवादन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेशभाऊ मगन अहिरे , व महिला महासचिव सुनिता ताई करून पुणे जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली ताई काळे यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे जिल्ह्याचे महासचिव वासुदेव येरुनकर, हवेली तालुका महिला उपाध्यक्ष अमृता खरात, इ. इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व महिला भगिनी देखील उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेश भाऊ अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रभर असेच मोफत प्रशिक्षण केंद्रे चालू करून महिला सक्षमीकरणाचे कार्य असेच सुरू महिला सक्षमीकरणासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी फाउंडेशन तत्पर राहील यावेळी प्रशिक्षण घेणाऱ्या महिला भगिनींना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आले. महिला महासचिव तसेच पुणे जिल्हा महिला अध्यक्ष यांनी देखील व्यवस्थित रित्या महिलांना मार्गदर्शन केले व फाऊंडेशनचे संस्थेच्या बाबतीत योग्य ते माहिती देऊन त्यांना भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष तसेच प्रकल्प संचालिका राजश्री ताई पाटोळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!