आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु – अजित पवार

आठवी पर्यंतचे वर्ग चारच तास भरणार 

Spread the love

पुणे  : पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट व वाढत्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा  व महाविद्यालयं एक फेब्रुवारीपासून कोविड नियमांचे पालन करत सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण चांगल्याप्रकारे सुरू आहे त्यामुळे नववी पासून शाळा सुरू होणार आहेत.

आठवी पर्यंतचे वर्ग चारच तास

नववी पासून पुढचे वर्ग पूर्णवेळ भरविण्यात येणार असून पहिली ते आठवीचे वर्ग चारच तास भरवले जाणार आहेत.

शाळेतच लसीकरण

नववी दहावी आणि अकरावीच्या 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शाळेत लसीकरण करण्याची सुविधा करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालकांनी घ्ययायचाचा आहे. याबाबत कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही असेही अजित पवार म्हणाले.अद्याप कोवीडचे संकट संपले नसल्याने मास्क वापरणे बंधनकारक आहे असे पवार म्हणाले. पुणे जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!