महाराष्ट्र

लसीकरणाचे प्रमाण वाढवा – नगरसेवक अरुण माने

Spread the love

तळेगाव : जिल्हाधिकारी यांनी गेल्या महिन्यामध्ये तळेगाव शहर हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्याचे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी जाधव यांनी नगरसेवकांच्या झालेल्या मिटिंग मध्ये सांगितलं . असे असताना तळेगाव शहराची लोकसंख्या पाहता जे लसीकरण होत आहे ज्या लसीकरणाचा पुरवठा तळेगाव मधील सरकारी रुग्णालयांमध्ये होत आहे, तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये होत असून तो पुरवठा जास्तीत जास्त करण्यात यावा अशी मागणी मावळ तालुक्याचे आरोग्य प्रमुख डॉक्टर व लोहारे यांच्याकडे नगरसेवक अरुण माने यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

. तळेगाव शहरामध्ये सरकारी रुग्णालय येथे पहिला डोस व मायमर मेडिकल कॉलेज या ठिकाणी दुसरा डोस अशा पद्धतीचे नियोजन केलेला आहे .परंतु या ठिकाणी रोज दीडशे ते दोनशे एवढे लस येतात. लस घेण्यासाठी शेकडो नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून लाईनमध्ये उभे असतात, परंतु लसीचा पुरवठा कमी होत असल्याने नाईलाजास्तव नागरिकांना परत जावं लागतं .म्हणून आपण तळेगाव शहरासाठी जास्तीत जास्त लस पुरवठा करावा अशी मागणी  लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!