आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर…

नागरिकांनी या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ६०, रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Spread the love

जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर…

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, ६ डिसेंबर.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती. यांच्या सहकार्याने आज दिनांक ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक , तळेगाव दाभाडे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
यानिमित्त तळेगावकर, मावळवासियांनी तसेच संस्थेच्या सदस्यांनी या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ६०, रक्तदात्यांनी रक्तदान केले.

जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे अध्यक्ष. बाळासाहेब जामदार, अ‍ॅड. देविदास टिळे, संदीप गोंदेगावे,  रमजान मुल्ला, सुनील साखरे,  दीपक पंडित,  सुमित पारखे,  मन्वेश लिमये,  जयश्री टिळे,  तस्मैया मुल्ला,  शिल्पा पारखी,  स्वाती पंडित, श्रिया लिमये या सभासदांनी शिबिराचे काम पाहिले. महिलांचा रक्तदान करण्यात विशेष सहभाग होता.
पिंपरी चिंचवड रक्तपेढी तर्फे  युवराज बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!