आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेत मावळ येथे  कर्वे मॅरेथॉन २०२२(फक्त महिलांसाठी) चे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेमध्ये चार वयोगटात एकूण १५७ महिला स्पर्धकांनी भाग घेतला.

Spread the love

महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेत मावळ येथे  कर्वे मॅरेथॉन २०२२(फक्त महिलांसाठी) चे आयोजन करण्यात आले होते.

 आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ६ डिसेंबर.

स्पर्धेमध्ये चार वयोगटात एकूण १५७ महिला स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती दीपक कंधारे , पावर लिफ्टिंग आशियन विजेत्या स्ट्रॉंग वुमेन आशिया सन्मानित कुमारी प्रांजल विनोद बच्चे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स विजेती यांच्या शुभहस्ते प्रथम भारतमाता,महर्षी कर्वे, बाया कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्पर्धेची सुरुवात व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळेस शाळा समिती सदस्य विक्रमशेट बाफना ग्रामपंचायत विद्यमान सदस्य दत्ताभाऊ शिंदे,प्राथमिक मुख्याध्यापिका अनिता देवरे, क्रीडाप्रमुख .गोकुळ खैरनार,सर्व शिक्षकवृंद,कर्मचारीवृंद, विद्यार्थी स्थानिक पत्रकार सुभाष भांडे सर, वनस्थळी महिला ग्रुप कामशेत,जागृती महिला मंडळ,पुणे यांच्या वतीने ॲम्बुलन्स व डॉ.पाटील मॅडम,नर्स यांचे विशेष योगदान मिळाले. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

प्रथम गट वय वर्ष १५ ते २५ प्रथम क्रमांक
कुमारी संतोषी दयानंद नरेलकर (कासारवाडी पुणे )
द्वितीय क्रमांक कुमारी अश्विनी आप्पासो बामणे (कामशेत)
वयोगट २६ ते ३५
प्रथम क्रमांक .सुंदर बाळू पावशे (खांडी)
द्वितीय क्रमांक .ज्योती संतोष झिटे (कामशेत)
वयोगट ३६ ते ५०
प्रथम क्रमांक  .रेखा गोकुळ खैरनार (लोणावळा)
द्वितीय क्रमांक सौ.सुरेखा संजय हांडे (तळेगाव दाभाडे)
वयोगट ५१ते १००प्रथम क्रमांक निता शंकर देशमुख (कामशेत)

द्वितीय क्रमांक उषा विश्वनाथ वाघमारे (कामशेत)
आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षक  संजय श्रीपती हांडे यांच्या सौभाग्यवती सुरेखा संजय हांडे यांचा वयोगट ३६ ते ५० या वयोगटात द्वितीय क्रमांक आला त्यांना मिळालेली द्वितीय क्रमांकाची रक्कम त्यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देणगी म्हणून परत देण्यात आली यांचे आश्रम शाळेच्या शाळा समितीचे सदस्य विक्रमशेठ बाफना यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक,सूत्रसंचालन  पंढरीनाथ वाडेकर सर यांनी केले.सर्व विजयी स्पर्धकांचे   अभिनंदन केले, वआभार प्रदर्शन .श्रीकांत बुरांडे सर यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!