ताज्या घडामोडी

रेंगाळलेल्या धनगर घरकुल योजनेला मल्हार सेनेच्या पाठपुराव्याने यश -बबनराव रानगे

Spread the love

जिल्ह्यातील 525 धनगर लाभार्थ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास
कोल्हापूर : (वर्षाराणी दुर्गे सरुडकर )
रेंगाळलेला धनगर घरकुल योजनेचा प्रश्न व लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळत नसल्याने मल्हार सेनेच्या वतीने केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे धनगर समाजाचे नेते, सरसेनापती बबनराव रानगेंनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हास्तरीय समितीने प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील 525 धनगर लाभार्थ्यांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कोल्हापूर : वर्षाराणी दुर्गे सरुडकर
भटक्या जमाती क – प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेचा निर्णय समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाने 2019 मध्ये घेतला होता.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील धनगर बांधवांनी घरकुल योजनेचे प्रस्ताव शासनास सादर केले होते.दरम्यान शासनाने मान्यता दिली पण अनुदान मिळण्यास वेळ लागत असल्याने कांही लाभार्थ्यांनी कर्जे काढून,हात उसने पैसे घेऊन आपली बांधकामे पूर्ण केली तर कांही लाभार्थी अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. समाज बांधवांना वेळेत अनुदानाचा लाभ मिळत नाही शासन धनगर बांधवांची फसवणूक करून केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे.यामुळे लाभार्थी अडचणीत येत असल्याचे निदर्शनास आल्याने धनगर समाजाचे नेते, सरसेनापती बबनराव रानगे यांनी समाज बांधवांच्यासह उपजिल्हाधिकारी संतोष कणसे यांना निवेदन देऊन मल्हार सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देत शासन दरबारी सतत पाठपुरावा केला .
जिल्हाधिकारी राहुल रेखावर,समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे यांनी निवेदन व आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून धनगर घरकुल योजनेतील जिल्ह्यातील 525 लाभार्थ्यांचे सहा कोटी तीस लाख वितरित करण्याची शासन मान्यता दिली. यामुळे धनगर घरकुल योजनेचा रेंगाळलेला मार्ग मोकळा झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!