आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे आयईईई विद्यार्थी शाखेचे उद्घाटन.

विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कार्यशाळा, व्याख्याने, प्रकल्प प्रदर्शन, शोधनिबंध लेखन, नॅशनल किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्स आदी उपक्रम आयट्रिपलई विद्यार्थी शाखे मार्फत आयोजित केले जातील..

Spread the love

नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे आयईईई विद्यार्थी शाखेचे उद्घाटन.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी,११ ऑक्टोबर.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे आयईईई विद्यार्थी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी आयट्रिपलई पुणे विभागाचे प्रमुख गिरीश खिलारी, आय अँड एम आयईईई सोसायटी चॅप्टर, पुणे विभागचे अध्यक्ष प्रा. मंदार खुर्जेकर , डॉ. परीक्षित महल्ले आयईईई आणि बीओएस संगणक अभियांत्रिकी चे वरिष्ठ सदस्य, सायबर सेल पुणे विभागाचे प्रमुख डॉ. संजय तुंगार, टॉप आयटी अकादमीच्या संचालक कविता पाटील, सॉफ्टटेक डेटा सिक्युरिटीज चे संचालक अमेय तांबे , पिंपरी चिंचवड स्टार्ट-अप इनक्युबेशन सेंटरचे व्यवस्थापक उदय देव आदी मान्यवर लाभले होते.आयट्रिपलई विद्यार्थी शाखेच्या मार्फत विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रांमध्ये नाविण्य आणणाऱ्या प्राध्यापक आणि उद्योग व्यावसायिकांशी नेटवर्किंग, स्थानिक पातळीवर नेटवर्किंग, कार्यक्रम, प्रकल्प यांसाठी निधी मिळवणे या विविध संधी प्राप्त होतात.

विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कार्यशाळा, व्याख्याने, प्रकल्प प्रदर्शन, शोधनिबंध लेखन, नॅशनल किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्स आदी उपक्रम आयट्रिपलई विद्यार्थी शाखे मार्फत आयोजित केले जातील, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा .

या शाखेचे सल्लागार डॉ. विनोद किंबहुने, प्राध्यापक समन्वयक राहुल दगडे व विद्यार्थी अध्यक्ष सानिया गपचूप यांनी नमूद केले. या प्रसंगी शिवम भारंबे, प्रणव खंडागळे, विनय इप्पिली आणि प्रतीक पोतदार या विद्यार्थांनी बनवलेली आयट्रिपलई विद्यार्थी शाखेच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, संगणक विभाग प्रमुख डॉ. विनोद किंबहुने यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमास मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी पाटील, आकांक्षा कारंडे आणि वैष्णवी सपकाळ या विद्यार्थांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!