आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

नवरात्रोत्सवात जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नितीन कोकणे प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खेळ रंगला पैठणीचा मध्ये ४८० महिलांचा सहभाग "

Spread the love

खेळ रंगला पैठणीचा मध्ये ४८० महिलांचा सहभाग “

आवाज न्यूज :  मावळ प्रतिनिधी, ११ ऑक्टोबर..

महिला या नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनिसाठी व्हावेत म्हणून नवरात्रोत्सवात जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नितीन कोकणे प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला माता भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खेळ पैठणीचा या कार्यकमात सुमारे ४८० महिला सहभागी झाल्या होत्या. सहभागी स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

कोरोना कालावधीत अनेक सणवार उत्सवांवर निर्बंध असल्यामुळे यंदाच्या वर्षी या नवरात्रोत्सव मध्ये महिलांनी दांडिया व रासगरबा ,फॅन्सी ड्रेस स्पर्धा,डान्स स्पर्धा,लकी ड्रॉ स्पर्धेत एकुण १८०० स्पर्धकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी नवरात्रोत्सवात आरतीसाठी वडगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला यांच्या हस्ते आरती घेण्यात आली.

मंडळास सदिच्छ भेट देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रांत आध्यक्ष मा.जंयतराव पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा. रूपालीताई चाकणकर, आमदार सुनिल आण्णा शेळके,आमदार शहाजीबापू पाटील आदी मान्यवर यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे नियोजन जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!