मावळलोणावळासामाजिक

लोणावळा शहरामध्ये अनधिकृत हातगाडया महामार्गाच्या कडेला, पार्किंग करुन जाणारे चालकांवर कारवाईचा बडगा.

Spread the love

लोणावळा शहरामध्ये अनधिकृत हातगाडया महामार्गाच्या कडेला, पार्किंग करुन जाणारे चालकांवर कारवाईचा बडगा.Action taken against drivers parking unauthorized handcarts on the side of the highway in Lonavala city.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २४ नोव्हेंबर.

२३ नोव्हेंबर रोजी लोणावळा शहरामध्ये प्रादेशिक परीवहन विभाग, लोणावळा,नगरपरिषद लोणावळा व लोणावळा शहर पोलीस ठाणे यांनी संमातरपणे लोणावळा शहरातील जुना पुणे ते मुंबई महामार्ग क्र. ४ वर महामार्गाच्या दुर्तफा लावण्यात येणारे वाहनावर परीणामकारक कारवाई करणेत आली तसेच फुड ट्रक अन्वये एका वाहनामध्ये खादय प्रदार्थाची विक्री करणारे चालकावर कारवाई करणेत
आली आहे. तसेच महामार्गाचे कडेला लावण्यात येणा-या फळे व खादय पदार्थ विक्री करणा-या हातगाडयावर दंडात्मक कारवाई करणेत आली आहे. व नो पार्किंग मध्ये वाहने पार्क करणारे चालकावर एकुण ३२ केसेस करण्यात आलेल्या आहेत. आजच्या कारवाईमध्ये एकुण ६३ केसेस दंड ४८,८०० – रुपये इतका करण्यात आलेला आहे.

तसेच भविष्यात लोणावळा शहरामध्ये अनधिकृत फळ विक्रेते, अन्न पदार्थ विक्रेते महामार्गाच्या कडेला
चार चाकी वाहने पार्क करुन निघून जाणे तसेच अनधिकृत साईन बोर्ड लावणे यांचेवर प्रभावीपणे कारवाई
करणेत येणार असल्याचे लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी  सत्यसाई कार्तिक सो व
प्रादेशिक विभाग पुणे यांनी सांगितले आहे.

सदरची कामगिरी ही सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक सो उपविभागीय पोलीस
अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा मार्गदर्शनाखाली सिताराम डुबल, लतिफ मुजावर पोलीस उप
निरीक्षक, वाहतुक विभागाचे पो. हवालदार शकिल शेख, अनिल शिंदे, सचिन कडाळे यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस ठाणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!