आरोग्य व शिक्षण

जैन सोशल ग्रुप, तळेगाव दाभाडे अध्यक्षपदी संजय संघवी यांची निवड

Spread the love

तळेगाव : जैन सोशल ग्रुप तळेगाव दाभाडेच्या सण 2022 ते 2024 च्या अध्यक्षपदी  संजय जव्हेरचंद संघवी यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.जैन सोशल ग्रुपची बैठक माजी अध्यक्ष संजय अमृतलाल ओसवाल यांच्या निवासस्थानी पार पडली.

त्या बैठकीमध्ये नवीन कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष  किरण हजारीमल ओसवाल यांनी पुढील प्रमाणे जाहीर केली.

उपाध्यक्ष-    हितेश मांगीलाल राठोड

सचिव –       समीर धनराज संघवी
सहसचिव –  इंदर हस्तीमल ओसवाल
खजिनदार –  निलेश कांतीलाल जैन

जैन सोशल ग्रुप अनेक सामाजिक कार्यक्रम दरवर्षी राबवित असते.त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर ,गोरगरिबांसाठी मदत हे उपक्रम प्रामुख्याने घेतले जातात असे संस्थापक अध्यक्ष किरण हजारीमल ओसवाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

करोना काळामध्ये सुद्धा जैन सोशल ग्रुप तर्फे रक्तदान व आरोग्य शिबिर घेऊन गोरगरिबांसाठी धान्य वाटप व काही मदत उपलब्ध करून दिली होती असे दिनेशभाई वाडेकर व राजू शाह यांनी सांगितले.नवनिर्वाचित   अध्यक्ष संजय संघवी यांनी समाजोपयोगी उपक्रम घेऊ असा विश्वास व्यक्त केला.

विनोद राठोड, राकेश ओसवाल, संजय मेहता, नितीन शाह यांनी मनोगत व्यक्त करून नवीन अध्यक्ष यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा व्यक्त केल्या.सदर बैठकीचे घनश्याम राठोड व  देवेंद्र शाह यांनी नियोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!