ताज्या घडामोडी

वैभव, पृथ्विक चमकले

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : वैभव बनेची भेदक गोलंदाजी आणि पृथ्विक पंडितची तडाखेबंद नाबाद अर्धशतकी खेळीमुळे विजय शिर्के क्रिकेट अकॅडमीने मर्यादित ४५ षटकांच्या लेदर बॉल डीएससीके चषक वासंतिक क्रिकेट स्पर्धेत यजमान ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी संघाचा ९ विकेट्सनी दणदणीत पराभव केला.

नाणेफेक जिंकून यजमान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाचा फायदा त्यांना उठवता आला नाही. वैभव बनेच्या भेदक माऱ्यासमोर यजमानांचा डाव २८ व्या षटकात १११ धावांवर आटोपला. वैभवने पाच षटकात २२ धावा देऊन पाच फलंदाज बाद केले. योगेश यादवने दोन विकेट्स मिळवल्या. यजमानांच्या सोवित श्रीमनने २८ आणि तेजस सॅलियनने १९ धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल पृथ्विक आणि विग्नेश खारगेने नाबाद फलंदाजी करताना १७ व्या षटकात ११५ धावा करत संघाच्या मोठया विजयावर शिक्कामोर्तब केले. वैभवसह सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या पृथ्विकने नाबाद ७४ धावा केल्या. तर दुसऱ्या बाजुने त्याला चांगली साथ देणाऱ्या विग्नेश खारगेने नाबाद ३० धावांची खेळी केली. या डावातील एकमेव विकेट पियुष कमलने मिळवली.

संक्षिप्त धावफलक : ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी : २८ षटकात सर्वबाद १११ ( सोवित श्रीमन २८, तेजस सॅलियन १७, वैभव बने ५-०-२२-५, योगेश यादव ५-०-१९-२) पराभुत विरुद्ध विजय शिर्के क्रिकेट अकॅडमी : १७ षटकात १ बाद ११५ ( पृथ्विक पंडित नाबाद ७४, विग्नेश खारगे नाबाद ३०, पियुष कमल ३-०-१९-१).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!