आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अतिदुर्गम निळशी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

Spread the love

मावळ : लीलावती भगवानदास ट्रस्ट अॉफ एज्युकेशन यांजकडून मावळ तालुक्यातील आंदर मावळातील शेवटचे टोक असणाऱ्या अतिदुर्गम निळशी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घुडे यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खांडी ग्रामपंचायतीचे सरपंच अनंता पावशे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास घुडे,पोपट घुडे,सुभाष म्हसे,रविंद्र घुडे,द्रोपदा देशमुख, मुख्याध्यापिका संगिता दाते इ.उपस्थित होते.

ट्रस्टच्या वतीने वह्या,पेन,पेन्सिल इ.साहित्य प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करुन शैक्षणिक विकास साधावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हे ट्रस्ट सामाजिक कार्य करत असते.ट्रस्टच्या या उपक्रमाचे आंदर मावळ परिसरात कौतूक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!