आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

लोणावळा व तळेगाव नगर परिषद प्रभाग रचना रद्द

Spread the love

आवाज न्यूज : ओबीसी आरक्षणाचे विधेयक विधानसभा व विधानपरिषदेत दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले आहे. या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यामुळे त्याचे कायद्यात रूपांतर झाले. या विधेयकानुसार प्रभाग रचना निवडणुकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार सरकारकडे असल्याने त्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करत शासनाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचना रद्द केल्या आहेत. त्यामुळे लोणावळासह तळेगाव नगर परिषदेची प्रभाग रचना रद्द झाली आहे. यामुळे निवडणुका सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोणावळा व तळेगाव नगर परिषद प्रशासनाने 2022 च्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करुन ती प्रसिद्ध केली होती. नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. परंतु आता या प्रभाग रचना रद्द झाल्या आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेली प्रभाग रचनेची पुढील कार्यवाही यापुढे राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात यावी असे आयोगाने म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!