महाराष्ट्र

गणेशोत्सव साजरा करुन मुंबईकडे निघाला, ट्रेलरची धडक अन् सगळं संपलं, युवकाच्या मृत्यूला कारण ठरली चालकाची ती चूक.

रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर एका ट्रेलरनं दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ट्रेलर चालकाला अटक करण्यात आली आहे.

Spread the love

गणेशोत्सव साजरा करुन मुंबईकडे निघाला, ट्रेलरची धडक अन् सगळं संपलं, युवकाच्या मृत्यूला कारण ठरली चालकाची ती चूक.

आवाज न्यूज : विशेष वार्ताहर, २६ सप्टेंबर.

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचा सत्र संपायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलर चालकाने दारूच्या नशेत समोर दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील संदेश सदानंद घाणेकर (वय ३२)या तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आहे.

गणेशोत्सवकरून तो पुन्हा मुंबईकडे दुचाकी वरून चालला होता. मुंबई वडाळा गणेश नगर येथे राहणारा तरुण आहे. संदेश हा नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होता. कानसई गावच्या हद्दीत हॉटेल नवरत्न जवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालक दारूच्या नशेत सुकेळी कडून नागोठणेकडे भरधाव वेगात निघाला होता. याप्रकरणी मध्य प्रदेशातील ओमप्रकाश रामलाल पटेल (वय ३६) या ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या अपघाताचे वृत्त कळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संदेश सदानंद घाणेकर याचं दोन वर्षांपूर्वी नुकतेच लग्न झालं होतं तो नोकरी निमित्त मुंबई वडाळा गणेश नगर येथे वास्तव्यास होता. आई वडील पत्नी या सगळ्यांना तो गावी ठेवून दुचाकीवरून मुंबईकडे निघाला होता. पण दुर्दैवाने संदेश चा प्रवास अखेरचा ठरला.

संदेश याच्या अपघाताचे वृत्त करतात वडाळा गणेश नगर परिसरातील मित्रांना धक्का बसला. संदेश हा मुंबई वडाळा येथील यश गोविंद पथकात सहभागी होत असे. मुंबई येथील नोकरी सांभाळून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. संदेश घाणेकर त्याच्या अपघाती मृत्यूने सावर्डे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. वाकण रोहा येथील पोलीस हवालदार निलेश गव्हाणकर यांनी या अपघाताची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. नागोठणे पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे जी.एम.भोईर अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!