आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहावीच्या परीक्षा आॕफलाईन सुरू

लोणावळ्यात तीन मुख्य केंद्रासह सर्व शाळांमधे परीक्षा केंद्रे

Spread the love

लोणावळा : दहावीच्या परीक्षा आजपासून आॕफलाईन सुरू झाल्या आहेत. लोणावळ्यात तीन मुख्य केंद्रासह सर्व शाळांमधे परीक्षा उपकेंद्रे असून डाॕ.बी.एन.पुरंदरे बहुविध विद्यालयात मुख्य केंद्रावर व आठ उपकेंद्रावर सुमारे ३८० विद्यार्थी आज मराठीचा पेपर देत आहेत.

डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयात -११८, गुरूकूल माध्यमिक विद्यालयात -८१, खंडाळा येथील नगरपरिषदेच्या रामकृष्ण मोरे विद्यालयात -१६, तुंगी येथील माध्यमिक विद्यालयात -२८, पंडीत नेहरू नगरपरिषद माध्यमिक विद्यालय , येथे -२०, देवघर येथे देशमुख माध्यमिक विद्यालयात -२६, सोजर माध्यमिक विद्यालय कुरवंडे येथे-१९, नागनाथ माध्यमिक विद्यालयात -३०, उर्दू माध्यमिक विद्यालय – नगरपरिषद , लोणावळा -४१ असे ३८० विद्यार्थी , विद्यार्थीनी दहावीच्या परिक्षेला बसले आहेत,असे मुख्य केँद्रप्रमुख -वाय.एस.बारवकर यांनी सांगितले.

उपकेंद्र प्रमुख डी.ई.रणपिसे , सहाय्यक परिरक्षक डी.बी.घाटकर , स्टेशनरी सुपरवायझर -ई.डी.वाजे आहेत. आॕक्झिलियन काॕंन्व्हेंट हायस्कूल या मुख्य परीक्षा केंद्र क्र २) व पाच उपकेंद्र मधे ४२५ विद्यार्थी , विद्यार्थीनी परिक्षेला बसले आहेत. आॕक्झिलियन काॕंन्व्हेंट हायस्कूल मधे -१९६, डाॕन बाॕस्को हायस्कूलमधे -८०, डी.सी स्कूलमधे -६९, गुरूकूलचे उपकेंद्रावर -४२, शांतीसदन हायस्कूलमधे -१८, तसेच बालग्राम हायस्कूल मधे -२० असे ४२५ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले आहेत,आसे केँद्रप्रमुख शीला फारतड यांनी सांगितले . अॕड.बाप्पूसाहेब भोंडे हायस्कूलमधे व तीन उपकेंद्र मधे ७४४ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत.या केंद्रातील मुख्य केँद्रप्रमुख पंकजा काचरे , उप केंद्रप्रमुख अमोल साळवे , स्टेशनरी परिरक्षक योगीता जाधव असे कामकाज पहात आहे.

या केंद्रावर १७१ आणि बहिस्थ विद्यार्थी असे २०० विद्यार्थी परीक्षा देत आहे. विद्या प्रसारिणी सभेच्या माध्यमिक विद्यालयात उपकेंद्र असून ३७५ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत, असे केंद्रप्रमुख डी.बी.कासार यांनी सांगितले .आज १६४ विद्यार्थी मराठीचा पेपर देत आहे.उद्या इंग्रजी माध्यमाचे पेपरला२११ विद्यार्थी बसले असून पेपर देतील. १५१ विद्यार्थी व २२४ विद्यार्थीनी असे परिक्षेला बसले आहेत. यावेळी प्राचार्य दरेकर हेही उपस्थित होते. श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय , भाजे मळवली येथे १४८ विद्यार्थी व एक असे १४९ विद्यार्थी परिक्षेला बसलेले आहेत.येथे उपकेँद्रप्रमुख म्हणून वर्षा क्षिरसागर काम पहात आहेत . आॕलसेंट हायस्कूलमधील -२० विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत..उपकेँद्रप्रमुख रबेका गळे काम पहात आहे. कोरोनाचा संसर्गामुळे काळजी : अॕंड भोंडे हायस्कूलमधे तसेच आॕक्झिलियन काॕंन्व्हेंट हायस्कूलमधे तसेच डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे केंद्रामधे कोरोनाच्या संसर्गाच्या काळजी मधून प्रत्येक ब्लाॕक मधे २५ विद्यार्थी बसविले असून सॕनिटायझरची सोय व विद्यार्थी जागेवर बसल्यावर त्याचे थर्मल स्क्रीनींग करण्यात येते .

शाळेत पेपर असेल त्या दिवशी सकाळी ७.३० ते साडेनऊ अशी आठवी व नववी चे विद्यार्थी यांचे वर्ग भरविले जातात..पेपर नसेल , तेव्हा पूर्णवेळ शाळा भरविली जाते..ता.४ आॕक्टोबर २०२१ रोजीपासून शाळा सुरू झाल्यावर सुमारे नव्वद टक्के ;तर १५ जानेवारी पासून पूर्णवेळ शाळा सुरू झाल्यानंतर ९५% उपस्थिती असते..आॕनलाईन ला कंटाळून गेलेले विद्यार्थी आता आॕफलाईन वर्गाला चांगली हजेरी लावत आहेत,असे अॕड.भोंडे हायस्कूल च्या मुख्याध्यापिका व केंद्रप्रमुख पंकजा काचरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!