आरोग्य व शिक्षण

वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी पूजा वहिले

Spread the love

वडगाव : येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी पूजा वहिले यांची निवड झाली आहे.आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पूजा वहिले यांनी भाजपचे उमेदवार किरण म्हाळसकर यांचा दोन मतांनी पराभव केला.

पूर्वीच्या उपनगराध्यक्षा प्रमिला बाफना यांनी पदाचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

या पदासाठी पीठासन अधिकारी तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा वहिले व भाजपचे किरण म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या मतदानात पूजा वहिले यांना 10 तर किरण म्हाळसकर यांना 8 मते मिळाली. त्यामुळे दोन मतांनी पूजा वहिले विजयी झाल्या असल्याचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी जाहीर केले.

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!