महाराष्ट्र

पेट्रोल डिझेल पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महागला

Spread the love

नवी दिल्ली : रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे  पेट्रोल डिझेल पाठोपाठ घरगुती गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसणार आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढी पाठोपाठ घरगुती गॅस महागला असून घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

या कारणामुळे वाढले दर 

4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.तसेच 6 आॅक्टोबर 2021 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.परंतु रशिया – यूक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे .त्यामुळे मंगळवारी सकाळी इंधनाच्या दरात वाढ झाली. याचाच परिणाम म्हणून विनाअनुदानित घरगुती सिलेडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

असे आहेत नवे दर 

पुणे           -952.5

नागपूर      -1001.5

नाशिक      -953

औरंगाबाद  -958.5

मुंबई         -949.5

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!