आरोग्य व शिक्षण

दिवाळीचे औचित्य साधून आदिवासी पाड्यावर स्वच्छता मोहीम

Spread the love

कार्ला : कार्ला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै संजय हुलावळे यांचा कार्याला उजाळा मिळावा हा दृष्टीकोन ठेवुन कार्ला येथे कै संजय हुलावळे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असुन,दिवाळीचे औचित्य साधून कार्ला येथील आदिवासी पाड्यावर आज प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

तसेच दिवाळीला आपल्या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आपले स्वःताचे दुःख बाजुला ठेवुन कै संजय हुलावळे यांचा पत्नी ग्रामपंचायत सदस्या,प्रतिष्ठानच्या सचिव श्रीमती वत्सला हुलावळे यांनी स्वखर्चाने आदिवासी बांधवांना व कार्ला ग्रांमपंचायत कर्मचाय्रांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब हुलावळे,ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,सनी हुलावळे,सतीश मोरे,भरत हुलावळे,रमेश जाधव,राजु सावळे,शैलेश चव्हाण,विशाल हुलावळे,अक्षय हुलावळे,आदेश हुलावळे,साहील हुलावळे,संकेत हुलावळे,यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी व आदिवासी बंधु भगिनी उपस्थित होते.

 

तसेच प्रतिष्ठानच्या वतीने दि 3 नोव्हेंबर रोजी रांगोळी स्पर्धा,दि 6 नोव्हेंबर रोजी किल्ले स्पर्धा,व दि 8नोव्हेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.दि 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाईल असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!