ताज्या घडामोडी

गुहागरातील सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांची उद्या शृंगारतळीत “पदयात्रा”

Spread the love

गुहागर ( प्रतिनिधी) सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एनपीएस योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक १४ मार्च २०२३ पासुन ऐतिहासिक बेमुदत संप पुकारलेला आहे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या बरोबरच गुहागर तालुक्यातीलही सर्व कर्मचाऱ्यांनी एकीची वज्रमूठ आवळलेली दिसुन येत आहे १४ मार्च रोजी गुहागर येथे तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा “विराट मोर्चाचे” आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता उद्या होणा-या ऐतिहासिक पदयात्रेत सर्व शासकीय विभागांतील सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे सदर पदयात्रेचा मार्ग गुहागर बाजार शृंगारतळी ते पाटपन्हाळे इंग्लिश मेडिअम स्कूल असा असणार असुन पदयात्रा ठिक दुपारी ३:०० वाजता गुहागर बाजार शृंगारतळी येथुन सुरू होऊन पाटपन्हाळे इंग्लिश मेडिअम स्कूल येथे सांगता होणार आहे तरी सदर पदयात्रेत सर्व शंभर टक्के कर्मचारी कसे हजर राहतील त्यासंबंधीचे नियोजन संबंधित घटक संघटनांनी केले आहे सदर संप व पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संपात सहभागी असणाऱ्या व पाठींबा संपास पाठिंबा असणऱ्या सर्व कर्मचारी यांनी उद्याच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गुहागर तालुका सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!