आरोग्य व शिक्षण

शिलाटणेच्या शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू , गावावर शोककळा..

पंचक्रोशित हळहळ व्यक्त.

Spread the love

शिलाटणेच्या शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू , गावावर शोककळा ;पंचक्रोशित हळहळ व्यक्त.Death of a Shiv devotee of Shilatane during treatment, the village mourned; panchakroshit expressed grief.

आवाज न्यूज :  मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा,प्रतिनिधी, १७ मार्च.

शिलाटणेच्या शिवभक्ताचा कु .आर्यन सोमनाथ कोँडभर (वय-अंदाजे १२), याचा आज दुपारी रावेत येथील ओजस या हाॕस्पिटलमधे उपचारादरम्यान मृत्यू झाला.ता.१० मार्च पासून त्याची मृत्यूशी झुंज संपली.त्याचे मृत्यूची वार्ता समजताच शिलाटणे गावावर शोककळा पसरली तसेच ;पंचक्रोशित हळहळ व्यक्त होत आहे.

शिवजयंतीनिमित्त (तिथीनुसार) शिलाटणे ! गावातील सुमारे ३५ तरूण व बाल मावळे मल्हारगडावरून शिवज्योत आणण्यासाठी टेंम्पोने गेले होते. गडावरून शिवज्योत घेवून परतत आसताना ता.१० रोजी रावेत ताथवडे रोडवर पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोराची धडक दिल्याने टेंम्पोमधील तरूण व टेम्पोपुढे मोटारसायकल वरील तरूण असे अनेक शिवभक्त गंभीर व काही किरकोळ जखमी झाले होते.आतिशय गंभीर जखमींना रावेत येथे उपचारासाठी दाखल केले होते.काहींना सोमाटणेफाटा येथे पवना हाॕस्पिटलमधे दाखल केले होते.दोन तीन दिवसापूर्वी त्यांचेवर शस्ञक्रिया केली होती.

कु.आर्यन सोमनाथ कोंडभर याचे मेंदूच्या नाजूक भागाला गंभीर जखम झाल्याने त्यावर शस्ञक्रिया केली होती. गेली सात दिवस देत असलेली निकराची त्याची मृत्यूशी झुंज आज आपयशी ठरली. गड आला पण सिंह गेला , अशीच भावना काहींनी व्यक्त केल्या.

 

या बाल मावळ्याचे दुःखद घटनेने शिलाटणेच्या ग्रामस्थांना शोक आवरणे कठीण गेले. अत्यंत कमी वयात झालेला आर्यन कोँडभर याचा मृत्यू सर्वांना चटका लावून गेला.
आज शिलाटणेच्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार प्रसंगी जनसागर लोटला होता.

येथे माजी राज्यमंञी बाळा तथा संजय भेगडे यांचेकडून श्रध्दांजलीपर भाषणात कै.कु.आर्यन च्या घरातील कुटूंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीन , असे त्यांनी आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!