ताज्या घडामोडी

संपाच्या चौथ्या दिवशी शासकीय, निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या सिंह गर्जनेने दुमदुमली अमळनेर नगरी, संप अधिक तिव्र करण्यासाठी, 36 संघटना मिळून तालुका समन्वय समिती गठीत

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

आज संध्याकाळी तालुक्यातील सर्व कर्मचारी संघटनांची बैठक तहसील कार्यालय याठिकाणी पार पडली यावेळी तालुक्यातील लढ्याला आणखी ताकदीने बळ देण्यासाठी समन्वय समितीची पुनर्स्थापना करण्यात आली. यात जवळपास *तालुक्यातील 36 संघटना पदाधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब पवार यांच्यासह, महिला जिल्हाध्यक्ष श्रीम. सुलोचनाताई वाघ, काँग्रेस शेतकरी सेलचे तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, खा.शि. मंडळाचे संचालक डॉ. अनिल शिंदे, मराठा समाज तालुकाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील तसेच इतर पदाधिकारी यांनी देखील भेट व लढ्याला पाठिंबा दिला.*यावेळी तालुकास्तरीय समन्वय समिती मार्फत रोजच्या लढ्याचे नियोजन व दिशा ठरवण्याचे काम करण्यात येईल. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते. या समितीत खालील संघटना पदाधिकारी यांची एकमताने समन्वय समितीत निवड करण्यात आली.

1) डॉ. कुणाल पवार (निमंत्रक, तालुका समन्वय समिती तथा विभागीय अध्यक्ष- जुनी पेन्शन संघटना)
2) श्री संदीप घोरपडे (राज्य कोषाध्यक्ष- टी डी एफ)
3) श्री तुषार पाटील (जिल्हा कौन्सिल सदस्य)
4) श्री प्रकाश पाटील (तालुकाध्यक्ष- माध्य मुख्याध्यापक संघ)
5) श्री सुशील भदाणे (तालुकाध्यक्ष- जुनी पेंशन संघटना)
6) श्री आशिष पवार (महा राज्य प्राथ.शिक्षक महासंघ)
7) श्री आर जे पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष- शिक्षक भारती)
8) श्री बापूराव ठाकरे (महा.राज्य समता शिक्षक परिषद)
9) श्री मकरंद निळे (तालुकाध्यक्ष- महा.टीचर्स असोसिएशन)
10) श्री के .डी. पाटील (उपाध्यक्ष- धनदाई माध्य.विद्यालय)
11) श्री संजय पाटील (कार्याध्यक्ष- क्रीडा समिती)
12) श्री एस. पी वाघ (उपाध्यक्ष- क्रिडा संघटना जळगाव)
13) श्री सुधीर चौधरी (प्रहार दिव्यांग संघटना)
14)श्री किशोर माळी (महा.राज्य हिवताप संघटना)
15) श्री व्ही. एस.बैसाणे (जि. प आरोग्य कर्मचारी संघटना)
16) श्री दिगंबर सैंदाने (ग्रामसेवक संघटना)
17) श्री पुरुषोत्तम पाटील (महसूल संघटना)
18)श्री कैलास पाटील (राष्ट्रवादी शिक्षक संघटना)
19) श्री पी.वाय.पाटील (महा.इले. वर्कर्स फेडरेशन)
20) श्री सोमचंद संदानशिव (न.पा.कर्मचारी संघटना)
21) श्री.वाल्मिक पाटील (सरचिटणीस- प्राथ. जि.शिक्षकसंघ)
22) श्री जितेंद्र ठाकूर (ग्रंथपाल संघटना तालुका अमळनेर)
23)श्री संदीप वाघ (प्राथमिक शिक्षक संघ जि. प.)
24) श्री छगन पाटील (दिव्यांग शिक्षक संघटना)
25) श्री अजय भामरे (समता शिक्षक परिषद)
26) श्री दिलीप प्रतापराव सोनवणे (पदवीधर शिक्षक संघटना)
27) श्री जितेंद्र पवार (लिपिक वर्गीय संघटना)
28)श्री भानुदास पवार (शिक्षक भारती संघटना)
29) श्री राजेंद्र बाबुराव कोळी (कास्ट्राईब संघटना)
30) श्री उमेश काटे(कार्याध्यक्ष, टी. डी. एफ)
31) श्री आनंदराव अहिरे,(तालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी शिक्षक संघटना)
32) श्री रणजित शिंदे (खा.प्राथ.मुख्याध्यापक संघटना)
33) श्री योगेश नाना पाटील (शिक्षक नेतृत्व)
34) श्रीमती पाकिजा पिंजारी (उपाध्यक्ष जुनी पेंशन संघटना)
35) श्रीमती क्रांती पाटील (अखिल प्राथमिक शिक्षक संघटना)
36) श्रीमती सविता अहिरे (महिला नेतृत्व)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!