ताज्या घडामोडी

प्रा.चंद्रकांत नेतकर यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ माहेश्वरी यांचे हस्ते पीएचडी प्रदान*

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

अमळनेर पटवारी हौसिंग सोसायटी येथील रहिवाशी पारोळा येथे किसान महाविद्यालयातील प्रा.चंद्रकांत मुरलीधर नेतकर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नव नियुक्त कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांच्या हस्ते पीएचडी पदवी दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदान करण्यात आली. डॉ. नेतकर यांनी भूगोल विषयांअतर्गत ‘A Study of Regional Disparities in Socio-Economic Development in Jalgaon District of Maharashtra’ या विषयावर संशोधन केले. त्यांना प्रोफेसर डॉ.ललित प्रताप संदानशिव, भूगोल विभाग प्रमुख. दादासाहेब रावल महाविद्यालय, दोंडाईचा यांनी मार्गदर्शन केले तर पारोळा येथील किसान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय.व्ही.पाटील यांनी सह मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. पारोळा येथील किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तसेच जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन मंत्री डॉ.सतीश भास्करराव पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व पटवारी गृहनिर्माण संस्था अमळनेर चे चेअरमन शिवाजी मोहन पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!