ताज्या घडामोडी

सांगली येथे २ एप्रिल रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास वाळवा तालुक्यातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव जाणार.

Spread the love

महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे

सांगली येथे शनिवार, २ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजता होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास वाळवा तालुक्यातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी दिली.

इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वाळवा तालुक्यातील प्रमुख धनगर समाज बांधव यांच्या बैठकीत ते बोलत होते. सांगली येथील रघुवंशी सोसायटी शाहूनगर, विजयनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा. ना. श्री. जयंतरावजी पाटीलसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व मा. ना. उदय सामंतसाहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार असून राज्यातील अनेक मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी व विविध पक्षातील कार्यकर्ते व धनगर समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

इस्लामपुर येथील बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक श्री. बाळासाहेब पाटील (बापू ), सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. विष्णू माने, नगरसेवक श्री. हरिदास पाटील, सांगली जिल्हा परिषद सदस्य श्री. संभाजीराव कचरे (आबा), धनगर समाज महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष उद्योजक बाबुराव हूबाले यांनी आपले मनोगते व्यक्त करून स्मारक लोकार्पण सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे समाजबांधवांना आवाहन केले आहे.

यावेळी बोलताना महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे म्हणाले की, या स्मारक लोकार्पण सोहळ्यास सांगली – सातारा – कोल्हापूर – सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

बैठकीस मल्हार सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख श्री. सुनील मलगुंडे, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. अविनाश खरात, किसनराव गावडे, शिवाजीराव डांगे, प्रकाश कनप, विकासराव नांगरे, संताजी गावडे, धनंजय कारंडे, लालासाहेब अनुसे, राजेंद्र गावडे, पांडुरंग वाघमोडे, उमेश गावडे, दत्तात्रय तांदळे, मंगेश लवटे, प्रकाश अनुसे, यांच्यासह वाळवा तालुक्यातील धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्वागत प्रास्ताविक बजरंग कदम यांनी तर आभार उमेश गावडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!