ताज्या घडामोडी

आशिषजी भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार प्रिमियर लीग (SPL) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Spread the love

🎾 सरकार प्रिमियर लीग 🎾
👉 *SPL* 👈
🎾सरकार मित्र मंडळ व मल्हार प्रतिष्ठान जयगड – खंडाळा यांच्या वतीने युवकांचे प्रेरणास्थान, युवासेना उपतालुकाप्रमुख मा. आशिषजी भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार प्रिमियर लीग (SPL) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खंडाळा – चाफे-गणपतीपुळे-नेवरे-जाकादेवी – जयगड मर्यादित असणार आहे. संघमालक जिल्ह्य़ातील कोणतेही दोन खेळाडू आपल्या निवडीनुसार घेऊ शकतात. ग्रामविकास मंडळाच्या वाटद फाटा येथील भव्य मैदानावर ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. . या लीगमधील सामने पाच षटकांचे खेळविण्यात येतील. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये – २२,२२२/-आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये – ११,१११/-आणि आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर यांसाठी आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत. तरी या परिसरातील संघमालक आणि खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे. यामध्ये विशेष म्हणजे सर्वांनसाठी लकी डाँर् कूपनचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध प्रकारची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत याचा पण सर्व खेळाडूनी लाभ घ्यावा

🎾स्पर्धेसाठी संपर्क –
👉शंकर पवार – 9422996147
👉एस्. के जाधव – 9421143230
.
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!