ताज्या घडामोडी

शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 19 /02 /2024 रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या 'छत्रपती शिवाजी' महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Spread the love

तळेगाव दाभाडे : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 19 /02 /2024 रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे,शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख, पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
विद्यार्थ्यांना शिवचरित्र अवगत व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व नियमावलीचे पालन करून राज्य गीताचे समूह गायन घेण्यात आले.याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तद्नंतर शालेय समिती अध्यक्षा सौ‌.रजनीगंधा खांडगे यांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख यांनी केला.

‘शिवजयंती’ चे औचित्य साधून विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पोवाडा गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.


अवघ्या सोळाव्या वर्षी बाल शिवाजीने रायरेश्वर किल्ल्यावर शंभूमहादेवाच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ हे नाट्य इ.सातवी ते नववी मधील विद्यार्थ्यांनी सादर केले. शिवरायांचा पोवाडा इ.सातवी मधील कु. सृष्टी वीर कु.सृष्टी खांजोडे या विद्यार्थिनींनी गायला.इ.सातवी मधील विद्यार्थिनी कु.शमिका केदारी हिने आदर्श राज्यकर्ता शिवराय यांच्या विषयी आपले वक्तृत्व सादर केले. इ. पाचवी, सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनमोहक नृत्यातून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.


इ. पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी शिवरायांचा, जिजाऊंचा, मावळ्यांचा पेहराव करून व्यक्तिरेखा सादर केल्या. विद्यालयाचे वातावरण ‘शिवमय’ झाले होते .

शिवरायांसारख्या पराक्रमी राजाच्या कार्यकर्तृत्वाची माहिती शालेय शिक्षिका सौ.अपेक्षा पाटील यांनी दिली.
शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेऊन स्वयंस्फूर्तीने कार्य करावे असे वक्तव्य केले.

मराठी माणसाचा कणा ताठ करून त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा शिवरायांनी दिली; त्यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला पाहिजे असे शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख,पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा,पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.तेजस्विनी सरोदे,प्राथमिक विभाग प्रमुख सौ.धनश्री पाटील,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इ.दहावी मधील विद्यार्थिनी कु.नेहा साळुंखे हिने केले .

या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष खांडगे,कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे,सचिव श्री.मिलिंद शेलार सर यांनी केले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
‘जय भवानी; जय शिवाजी’ जयजयकार करत कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!