मावळ

‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम नगरपरिषद कार्यालयात संपन्न

Spread the love

 तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी एन. के. पाटील आणि तळेगाव दाभाडे पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांनी समाजाचे विषय सकारात्मकरित्या मांडावे असे आवाहन केले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवन, शिक्षण आणि त्यांचे पत्रकारितेचे योगदान याची माहिती विशद केली . सदर कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचे गणेश बोरुडे, प्रभाकर तुमकर, राजेश बारणे, छायाचित्रकार श्रीकांत चेपे तसेच माजी सदस्य सचिन टकले आणि नगर परिषदेच्या कर निरीक्षक विजय शहाणे, भांडार प्रमुख सिद्धेश्वर महाजन, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सुवर्ण काळे, संगणक विभाग प्रमुख सोनाली सासवडे, रोहित भोसले, करसंकलन लिपिक प्रवीण माने, विलास वाघमारे, आदेश गरुड, प्रवीण शिंदे, विशाल लोणारे, आशिष दर्शले, उषा बेल्हेकर, प्रफुल्ल गलीयत, सनी ननावरे, नाईक अनिल इंगळे, शिपाई चंद्रशेखर खंते आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आस्थापना लिपिक भास्कर वाघमारे यांनी केले तर आभार कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!