आरोग्य व शिक्षण

तळेगाव चाकण महामार्गावर खोदण्यात आलेल्या साईट पट्ट्या देत आहेत अपघातांना आमंत्रण

Spread the love

तळेगाव : तळेगाव चाकण महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तळेगाव-दाभाडे हद्दीत खोदण्यात आलेल्या साईट पट्ट्यांच्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काल शुक्रवार (दि 9 सप्टेंबर) रोजी रात्री दहाच्या सुमारास मनोहर नगर प्रवेशद्वाराजवळ झालेल्या अपघातात एक चारचाकी वाहन या खोदून ठेवलेल्या खड्ड्यात गेले. या अपघातात वाहन चालक जखमी झाला आहे. 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेले रस्ता रुंदीकरणाचे काम 1 महिन्यापासून बंद आहे. मात्र कामासाठी खोदून ठेवलेल्या साईट पट्ट्यांचे खड्डे तसेच असल्याने वारंवार अपघात होत आहेत. 4 सप्टेंबर रोजी आवाज न्युज ने या संदर्भात बातमी प्रसारित केली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता वैशाली भुजबळ यांच्याशी याबाबत संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काम का बंद आहे ?कधी सुरू होणार? हे समजू शकले नाही.

अपघात टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचे सुरु केलेले काम अपघातांना निमंत्रण देत आहे. या महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत असल्याचा आरोप तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!