आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

 बाल वारकरी प्रशिक्षण कार्यशाळा , संगमेश्वर , वाडीवळे येथे १०० विद्यार्थी शिबिरात गायनात मग्न.. ता.१८ रोजी सांगता

कार्यशाळेस वाडिवळे ग्रामस्थ , महिला वारकरी मंडळ आणि वारकरी भजनकरी यांचे सहकार्य लाभले आहे. विशेष सहकार्य मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे. विद्यार्थांना योगा , भगवतगीता , ज्ञानेश्वरी , हरिपाठ , गाथा , वारकरी भजन, काकडाआरती आणि विठ्ठल जप शिकविले जात आहेत.

Spread the love

 बाल वारकरी प्रशिक्षण कार्यशाळा , संगमेश्वर , वाडीवळे येथे १०० विद्यार्थी शिबिरात गायनात मग्न.. ता.१८ रोजी सांगता ..
लोणावळा ता.१७ (प्रतिनिधी ) श्री विठ्ठल परिवार मावळ तालुका संस्थापक आमदार श्री. सुनिलआण्णा शेळके यांचे वतीने संगमेश्वर मंदिरात , वाडिवळे, मावळ येथे बाल वारकरी प्रशिक्षण कार्यशाळा , निवासी शिबिरात सुमारे १०० विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले आहेत. उद्योजक सुधाकर शेळके यांचे संकल्पनेतून हा कार्यक्रम ता.१० ते १८ पर्यत होत आहे.
ता.१८ रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प.संतोष महाराज काळोखे , देहू यांचे कार्यशाळेची सांगता कीर्तनाने होणार आहे.
या शिबीराचे उद्घाटन पंडीत किरणजी परळीकर आणि उद्योजक शंकरराव शेळके यांचे हस्ते ता.१० रोजी झाले. या बाल वारकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे संचालक ह.भ.प.किसन महाराज केदारी , ह.भ.प.दिलीप महाराज खेंगरे यांचे नेतृत्वाखाली व श्री विठ्ठल परिवार , मावळचे अध्यक्ष ह.भ.प.प गणेश महाराज जांभळे यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे. या शिबिरास ह.भ.प.गोपीचंद महाराज कचरे , ह.भ.प.दत्ता महाराज शिंदे , ह.भ.प.सुखदेव महाराज ठाकर आणि लक्ष्मणजी पारखी , सुरेश महाराज केदारी तसेच अमोल भेगडे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस वाडिवळे ग्रामस्थ , महिला वारकरी मंडळ आणि वारकरी भजनकरी यांचे सहकार्य लाभले आहे. विशेष सहकार्य मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी केले आहे. विद्यार्थांना योगा , भगवतगीता , ज्ञानेश्वरी , हरिपाठ , गाथा , वारकरी भजन, काकडाआरती आणि विठ्ठल जप शिकविले जात आहेत. कांबरे नामा येथील योगानंद तिर्थ यांच्या अस्थि विसर्जन दिंडीमधे या बाल वारकऱ्यांना सहभागी .होण्याचे भाग्य लाभले. यावेळी विणेकरी भाऊसाहेब टाकळकर , बाळासाहेब जांभूळकर आणि तानाजी जांभूळकर आदींनी विशेष सहकार्य केले आहे.
यावेळी पंडीत श्री.किरणजी परळीकर यांनी विद्यार्थांना अभंग आणि गवळणी विविध चालीमधे व रागामधे कसे गायचे हे शिकवले. योगशिक्षक संतोष टाकवे यांनी योगा शिकविले . ह.भ.प.भिमाजी महाराज भानुसघरे यांचेकडून हरिपाठ शिकविण्यात आला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!