आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या संयुक्त मुख्य परीक्षा २०२०मध्ये त्वरित निर्णय करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी.

परीक्षेची तारीख तात्काळ जाहीर करावी अशी मागणी एमपीएससी चे विद्यार्थी करत आहेत.

Spread the love

न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या संयुक्त मुख्य परीक्षा २०२०मध्ये त्वरित निर्णय करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी. पुणे -न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली संयुक्त मुख्य परीक्षा २०२० च्या भरती प्रक्रियेचा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच उर्वरित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.यासंदर्भात एमपीएससीच्या विद्यार्थ्यां तर्फे पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

तब्बल अडीच वर्षे उलटून गेली असून संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही या कारणामुळे २२ व २९ जानेवारी २०२२ रोजी नियोजित असलेली मुख्य परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे.उच्च न्यायालयात (Writ Petition-Stamp No:- WPST/4322/2022) ही केस दिनांक १७/०२/२०२२ रोजी दाखल केली आहे,चार महिने उलटून देखील आजवर यावर एकही सुनावणी झालेली नाही.यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मानसिक व आर्थिक तणावाने ग्रस्त आहेत.

राज्य सरकार व एम.पी.एस.सी(MPSC) आयोगाशी समन्वय साधावा तसेच महाधिवक्ता यांच्याद्वारे उच्च न्यायालयाच्या १३ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निदर्शनास आणून द्यावा व मुख्य परीक्षेची तारीख तात्काळ जाहीर करावी अशी मागणी एमपीएससी चे विद्यार्थी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!