महाराष्ट्र

पेट्रोल आणि डिझेल तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी होणार स्वस्त  वाढती महागाई आणि वाढत्या इंधन दराने होरपळणाऱ्या जनतेला केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Spread the love

 दिल्ली:पेट्रोल आणि डिझेल तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी होणार स्वस्त. वाढती महागाई आणि वाढत्या इंधन दराने होरपळणाऱ्या जनतेला केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता केंद्राने इंधनावरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याप्रमाणे पेट्रोल वरील अबकारी कर प्रती लिटर ८ रुपये आणि डिझेल वरील अबकारी कर ६ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल जवळपास ९.५० रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वत होणार आहे. या बाबतची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली.
महागाई ; सर्वसामान्यांना थोडा दिलासा ! पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरात                                                                 महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने अखेर दिलासा दिला आहे. माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी  कमी होणार आहेत. यामुळे सरकारच्या महसुलावर दरवर्षी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आता प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले. यामुळे वार्षिक सुमारे 6100 कोटींच्या महसुलावर परिणाम होईल.

अजित पवार: पेट्रोल डिझेल दर कपातीवर अजितदादा म्हणतात –पुन्हा काहीतरी कारण सांगून दर वाढवू नये म्हणजे झालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!