आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे १५ मे ते २५ मे २०२२ या कालावधीमध्ये भरवण्यात आलेल्या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात,

कला शक्ती दे, कला भक्ती दे, कलासक्ती दे नटराजा….. बाळ गोपालांचे नटराजाला साकडे!

Spread the love

कला शक्ती दे, कला भक्ती दे, कलासक्ती दे नटराजा…..
बाळ गोपालांचे नटराजाला साकडे!

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे १५ मे ते २५ मे २०२२ या कालावधीमध्ये भरवण्यात आलेल्या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात, नाना भालेराव कॉलनीतील सुंदर अश्या हिरवळीवर झाली.
कला शक्ती दे, कला भक्ती दे, कलासक्ती दे नटराजा…..या शिबिरातील मुलांच्या प्रार्थनेनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. नाना भालेराव कॉलनी मधील बागेतील हिरवळीवर झालेल्या सांगता समारंभात शिबिरातील मुलांचे विविध कलाविष्कार सादर करण्यात आले.
प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरामध्ये मातीकाम, रंगकाम, नाट्य, संगीत, नृत्य, पपेट, टीम स्पिरीट, प्रॉब्लेम सॉलव्हिंग, डिसिजन मेकिंग, प्रसंग नाट्य, मुकाभिनय, योगासने अशा अनेक कला शिकवण्यात आल्या. त्याच सोबत हेरिटेज म्युझिक अकॅडमी व फ्रेंड्स ऑफ नेचर अशा ठिकाणी मुलांची सहलही काढण्यात आली.
प्रसिद्ध अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांच्यासोबतच मीरा भरड, सायली नायर, सुपर्णा गायकवाड, पूजा डोळस, विनया केसकर, वृषाली आपटे, मारुती पवार आदी प्रशिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ‘गेली दोन-अडीच वर्ष घरामध्ये बसलेल्या मुलांना नवीन संजीवनी मिळाली, तसेच घरी किंवा शाळेत ही ज्या गोष्टी शिकता आल्या नसत्या, त्या शिकायला मिळाल्या. ‘शिबिराचा कालावधी आणखी थोडा जास्त असावा, त्याचबरोबर अशा पद्धतीचे शिबिर हे दर सुट्टीत व्हावे’, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. नाट्यपरिषदेचे तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश धोत्रे यांनी याप्रसंगी मुलांचे अभिनंदन करत, याच मुलांमधून उद्या उत्तमोत्तम कलाकार घडावेत व मावळ तालुक्याचे नाव या मुलांनी गाजवावे अशा शुभेच्छा दिल्या नाट्यपरिषदेचे श्री. विश्वास देशपांडे यांनी हे शिबिर फक्त सुट्ट्या पुरते मर्यादित न ठेवता बालभवनच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर मुलांसाठी विविध उपक्रम राबवता यावेत, यासाठी प्रयत्न करूयात असे सांगितले .
या शिबिराचे उत्तम आणि शिस्तबद्ध आयोजन आणि नियोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्या नयना डोळस व क्षीप्रसाधन भरड यांनी केले.

प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाला मा. सुरेश धोत्रे (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखा), तसेच मा. कैलास काळे (अध्यक्ष,आदर्श मित्र मंडळ, नाना भालेराव कॉलनी), मा.विश्वास देशपांडे, मा. राजेश बारणे (उपसंपादक, आवाज न्युज), मा. भरतकुमार छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. हॉटेल ड्रीमलैंड चे श्री. संग्राम जगताप यांच्यातर्फे सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. सोहम पवार व श्रेया अलबाळ या युवा कलाकारांनी शिबिर यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.
श्री गणेश काकडे यांचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!