आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

इंदूरी मावळ: दादू इंदूरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सहा महसूली विभागात “लोकनाट्य व वग नाट्याचे प्रयोग आयोजित करावे…

"गाढवाचं लग्न" हे वगनाट्य स्व. दादू इंदूरीकर यांनी अजरामर केले.या वगनाट्याचे हजारो प्रयोग झाले.त्यामुळे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,जेष्ठ नेते शरद पवार अशा अनेक मान्यवरांनी या वगनाट्याचे त्याकाळात भरभरून कौतुक केले.

Spread the love

इंदूरी मावळ: दादू इंदूरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सहा महसूली विभागात “लोकनाट्य व वग नाट्याचे प्रयोग आयोजित करावे…
——————————————-
विनोद सम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानची
सरकारकडे मागणी..

मुंबई – राष्ट्रपती पुरस्कार विजेते जेष्ठ लोककलावंत विनोद सम्राट दादू इंदूरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी राज्याच्या सहा महसूल विभागात लोकनाट्य, तमाशा,वगनाट्य,आणि लोककला जतन संवर्धनासाठी चर्चा सत्रे आयोजित करण्यात यावी.अशी मागणी विनोदसम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली.

यासंदर्भात गुरुवार दि.२६ मे रोजी विनोदसम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक             बिभीषण चवरे यांची भेट घेवून यासंबंधी विविध मागण्याचे निवेदन दिले.
या शिष्टमंडळात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रकाश खांडगे,उपाध्यक्ष प्रा डाॅ गणेश चदंणशिवे, संजय चव्हाण,सचिव प्रभाकर ओव्हाळ, कोषाध्यक्ष अँड.  रंजना भोसले, विश्वस्त राजेंद्र सरोदे,ज्ञानेश महाराव,सोपान खुडे आणि खंडूराज गायकवाड यांचा समावेश होता.
“गाढवाचं लग्न” हे वगनाट्य स्व. दादू इंदूरीकर यांनी अजरामर केले.या वगनाट्याचे हजारो प्रयोग झाले.त्यामुळे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,जेष्ठ नेते शरद पवार अशा अनेक मान्यवरांनी या वगनाट्याचे त्याकाळात भरभरून कौतुक केले.
अशा या महान लोकलावंतांचा जन्मशताब्दी सोहळा सुरू झाला आहे.त्याचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक महसूली विभागात “गाढवाचं लग्न”या वग नाट्याचा प्रयोग करावा.त्याच प्रमाणे त्याअनुषंगाने लोककलेच्या इतिहासाला उजाळा मिळण्याकरिता परिसंवाद, चर्चा सत्रे याचे आयोजन करावे. अशा विविध मागण्याचे निवेदन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री.बिभीषण चवरे यांना विनोद सम्राट दादू इंदूरीकर लोककला प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!