आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

मुळशी तालुक्यातील मारुंजी गावातील शेतकरी कुटुंबातील काम करणारे सामाजिक कार्यकर्ते पै.शिवाजीराव बुचडे यांच्या कार्याचा “आवाज न्यूज” ने घेतलेला सारांश.

समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या विविध श्रेत्रातील कर्तुत्ववान मंडळीचे कौतुक व्हावे,त्यांना पुढील कार्यास प्रैरणा मिळावी यासाठी सदैव प्रयत्न. पै.शिवाजीराव बुचडे.

Spread the love

मुळशी पुणे:महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनाच्या पटलावर कार्याभिमुख व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारे, 
विविध श्रेत्रातील अनमोल कार्याची दखल घेणारे कार्यकुशल व्यक्तिमत्त्व.
“पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस”
पैलवान  शिवाजीराव बुचडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा घेतला मागोवा.
शिवाजीराव बुचडे हे क्रीडा, कामगार, सहकार ,सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमव आहे खेळाडू पंच ,प्रशिक्षक, संघटक संयोजक तसेच एका राष्ट्रीय खेळाडू चे पिताश्री असे त्यांच्या जीवनातील अनेक पैलू आहेत.
* सरचिटणीस राष्ट्रीय तालीम संघ पुणे.
* मा उपाध्यक्ष जयहिंद सहकारी बँक पि.चि.
* संस्थापक अध्यक्ष संग्राम प्रतिष्ठान पुणे.
*महाराष्ट्र श्रम भुषण पुरस्काराचे मानकरी.
*अध्यक्ष आनंदा हाईटस सहकारी गृहनिर्माण संस्था.
अशा विविध श्रेत्रातील संस्थावर सदैव कार्यरत आहेत.
कर्तुत्ववान व यशस्वी व्यक्तीतींची अनेकदा दखल घेतली जात नाही तर कधी अंगी कर्तुत्व असुनही मार्गदर्शनाविना अर्धवट रस्त्यातून परतणारेही अनेक जण असतात म्हणून अशा व्यक्तींना संघर्षाच्या योग्य वळणावर पाठबळ देण्याचा निर्धार करून,पैलवान  शिवाजीराव बुचडे यांनी सुरू केलेले कार्य आदर्शवत आहे मुळशी तालुक्यातील मारुंजी गावातील शेतकरी कुटुंबातील सामान्य परिस्थितीमध्ये आयुष्यात आपणही एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे हे स्वप्न त्यांनी लहानपणीच पाहिलं,
लहानपणापासून कुस्ती क्षेत्राकडे त्यांचा असणारा विशेष ओढा वडिलांनी हेरला होता शिक्षण व तालीमसाठी पुणे येथे पाठविले शालेय जीवनातच कुस्ती क्षेत्रात तालुका जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे क्रीडा क्षेत्रात नैपुण्य संपादन केले म्हणून श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.                                                                     त्यावेळी बाबासाहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन प्रोत्साहन आत्मीयतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवाजीराव क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले. त्याचवेळी किर्लोस्कर कंपनी मध्ये नोकरी करीत असताना, अनेक कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले.नोकरी सांभाळून सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्र पोलीस मित्र मंडळाच्या मुळशी तालुका अध्यक्ष पदी कार्यरत असताना, विविध उपक्रम राबविले ,पुणे जिल्हा पोलीस मित्र मंडळाचे जिल्हा संघटक म्हणून काम करताना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत क्रीडा स्पर्धा,सामाजिक उपक्रम राबविले कुस्ती खेळाबरोबर ॲथलेटिक्स मध्ये आवड असल्यामुळे अनेक मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळविले. त्यावेळी खेळाडू,पंच , प्रशिक्षक, होण्याच्या ईर्षेने ॲथलेटिक्स मधील जिल्हा,राज्य पंच परिक्षा उत्तीर्ण झाले त्यामुळे, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अनेक राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टेक्निकल ऑफिशयल म्हणून काम करण्याची अनमोल संधी मिळाली क्रीडा क्षेत्रातील योगदान सामाजिक क्षेत्रातील योगदान हे नोकरी सांभाळून करत असल्याने महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी विविध पुरस्कारांनी आजवर शिवाजीरावानां गौरविण्यात आले अत्यंत प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर सहकार क्षेत्रात कार्यरत होण्याच्या दृष्टीने मुळशी तालुक्यातील पहिली सहकारी बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला सहकार क्षेत्राचा अनुभव असलेले जवळचे स्नेही बरोबर कार्यरत राहुन मुळशी तालुक्यातील पहिली सहकारी बँक जयहिंद सहकारी बँकेची स्थापना केली संस्थापक संचालक ते उपाध्यक्ष पदी कार्यरत असताना शेतकरी,कामगार,छोटे व्यावसायिक सह सर्व सामान्यांना आर्थिक मदत,भांडवल उपलब्ध करण्यात सातत्याने पाठपुरावा करून सदैव सहकार्य भावनेतुन सामान्य माणसाला बळ दिले सदैव कार्यरत राहणे क्रीडा सामाजिक कामगार सहकार क्षेत्रात नौकरी सांभाळून करत असल्याने आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून संग्राम प्रतिष्ठान पुणे ची स्थापना केली संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत असल्याने राज्य पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून,जिवलग सहकारी मित्रांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संग्राम प्रतिष्ठान च्या माध्यमातून नवयुवकांना प्रेरणा मिळवण्यासाठी सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेसाठी समाजातील विविध श्रेत्रातील मान्वरांना संग्राम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौरविण्यात येते. एकंदरीत समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या विविध श्रेत्रातील कर्तुत्ववान मंडळीचे कौतुक व्हावे, त्यांना पुढील कार्यास प्रैरणा मिळावी यासाठी सदैव प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होऊन कार्यमग्न राहावे हेच आजवरच्या जीवनाचे ध्येय ठेवले आहे.                                                            पै.शिवाजीरावांना ,महाराष्ट्र शासनाने–कर्तबगार कामगार पुरस्कार ० गुणवंत कामगार पुरस्कार ० महाराष्ट्र श्रम भुषण पुरस्कार आशा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.                          कुस्ती क्षेत्रामुळे आपणास जीवनाचा अनमोल मार्ग मिळाला, म्हणून ज्या तालमीमध्ये मल्लविद्या घेतली तेथे तालीमीचे प्रशिक्षक म्हणून काम करत राहावे असे विचार आल्या मुळे क्रीडा क्षेत्रात कार्यरत होण्याच्या दृष्टीने कार्यरत आहेत. तालीमीच्या वतीने राष्ट्रीय तालीम संघावर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली अंतःकरणातुन आवड असल्यामुळे प्रामाणिकपणे काम करताना मला संघांच्या कार्यकारिणी सदस्य ते सहसचिव ते सरचिटणीस पदी काम करण्याची अनमोल संधी मिळाली आहे नोकरी सांभाळून शिवाजीराव विविध श्रेत्रातील विविध उपक्रमात ( पदावर) जबाबदारी संपूर्णपणे यशस्वी पाडताना मुलगा संग्राम ला सिव्हिल इंजिनिअर पर्यंत शिक्षण घेण्यासाठी लाखमोलाचे पाठबळ तसेच मुलगी संपदा बुचडे-केंदळे हिला पदवी पर्यंतचे शिक्षण तसेच घराण्याची क्रीडा क्षेत्रातील परंपरा ॲथलेटिक्स मधील आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या अनमोल कामगिरी बजावली महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून चार राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले नऊ राष्ट्रीय दोन “ऑलइडिया स्पर्धा” एक आंतरराष्ट्रीय “मॅरेथॉन स्पर्धा” भारतीय गटात २१किमी हाफ मॅरेथॉनमध्ये सुवर्ण पदक मिळवून दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे आजवर विविध श्रेत्रातील विविध उपक्रमात सहभागी होऊन नोकरी सांभाळून सदैव राजकारण विरहित राहुन कार्यरत राहणे हे जीवनाचे ध्येय बाळगून आहे आजही विविध श्रेत्रातील विविध श्रेत्रातील अनेक संस्थांच्या विविध जबाबदाऱ्या लीलया पार करून सदैव कार्यमग्न आहेत आजवर विविध संस्थानी महाराष्टातील दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते विविध पातळीवरील अत्यंत मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे हेच शिवाजीरावांच्या आजवरच्या वाटचालीचे, कार्याचे सार्थक झालं आहे सामाजिक कार्यकर्ते ते क्रीडा संघटक शासनाचे गुणवंत कामगार अशा दैदिप्यमान कामगिरी चा आढावा घेतला आहे शिवाजीराव बुचडे यांच्या कार्याचा सारांश शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!