आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घ्यावा.डॉ. दीपक शहा

पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या काँक्रिटीकरणामुळे तापमानावर अनिष्ट परिणाम होत आहे. याबाबतीत केंद्र व राज्यसरकार, महापालिका वेळोवेळी निर्णय घेत आहे. परंतु, शहरवासियांची देखील जबाबदारी आहे.

Spread the love

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घ्यावा.डॉ. दीपक शहा
आवाज न्यूज चिंचवड 14 ः पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या काँक्रिटीकरणामुळे तापमानावर अनिष्ट परिणाम होत आहे. याबाबतीत केंद्र व राज्यसरकार, महापालिका वेळोवेळी निर्णय घेत आहे. परंतु, शहरवासियांची देखील जबाबदारी आहे. यासाठी कमला शिक्षण संकुलचे संस्थापक डॉ. दीपक शहा यांनी संस्थेत शिकणारे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना आपापल्या घरात असलेला निरोपयोगी प्लॉस्टिक, बंद इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी पर्यावरणाला घातक वस्तू कॉलेजमध्ये आणण्याचे आवाहन केले. त्यासाठी शिक्षकांची समिती गठीत केली होती. त्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘जागतिक पर्यावरण दिन’ सप्ताह स्वरूपात सामुहिकरित्या साजरा केला. त्यात वेगवेगळा प्लॅस्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, इलेक्ट्रिकल वस्तू, निरोपयोगी संगणक, मोबाईल आदी टाकावू वस्तूंचे एकत्रित करण्यात आले. व त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात आले.
प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, समिती प्रमुख डॉ. प्रिती कोल्हे, डॉ. जयश्री मुळे, डॉ. राजश्री ननावरे, डॉ. अनामिका घोष, अपर्णा कोरडे, प्रा. माधुरी डंबल, प्रा. जयश्री कांबळे, प्रा. तुळशीराम कांबळे, प्रा. शाहीन भालदार, प्रा. मिनल भंडारी, प्रा. नव्या दंडवाणी, प्रा. मोनाली चौधरी समवेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
संस्थापक डॉ. दीपक शहा म्हणाले, उत्तम आरोग्य व अल्हाददायक वातावरणासाठी युवा पिढीने जागरूक राहिले पाहीजे. हवेतील उष्णता कमी करण्यासाठी वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, निरोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू उघड्यावर टाकू नये, यासाठी प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी सुमारे 150 विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील टाकावू साड्या, कपडे एकत्रित जमा करून त्यांना तज्ञ प्रशिक्षकाद्वारे मार्गदर्शन व प्रशिक्षण देत त्यांच्याकडून 320 कपड्याच्या पिशव्या तयार केल्या त्याचे वाटप आकुर्डी येथील भाजी मंडईत येणार्‍या ग्राहकांना मोफत वाटण्यात आल्या. यावेळी प्लॅस्टिकच्या पिशव्या टाळा, कापडाच्या पिशव्या वापरा या संदेशाचे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेत नागरिक व भाजी विके्रत्यांमध्ये जनजागृती केली. या स्तुत्य उपक्रमात सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टाकावू वस्तू एकत्रित करण्याचा उपक्रम केला. तसेच, अनेक विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकाद्वारे पर्यावरणाचे महत्त्व चित्र स्वरूपात साकारले. त्यासाठी डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. गीता कांबळे, प्रा. अस्मिता यादव, प्रा. मनिषा पाटील, प्रा. संतोष उमाटे, प्रा. सुशिल भोंग आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!