क्रीडा व मनोरंजन

आशिष वायंगणकरची भेदक गोलंदाजी

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : आशिष वायंगणकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अवर्स क्रिकेट क्लबने मांडवी मुस्लिम संघाचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ६५ व्या शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मांडवी मुस्लिम संघाच्या फलंदाजांनी आशिष आणि गोलंदाजीत त्याला तेवढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या भार्गव पाटीलच्या अचूक माऱ्यासमोर सेंट्रल मैदानावर सपशेल शरणागती पत्करली. त्यांच्या शंकर बालसुब्रह्मण्यम (१६) आणि प्रणव टिल्लूचा (१२) अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्येला स्पर्श करता आला नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना चांगलाच दणका देताना आशिषने ५ .३ षटकात ३ निर्धाव षटके टाकत ५ धावांत ४ विकेट्स मिळवल्या. भार्गवने १८ धावांत ३ विकेट्स मिळवत मांडवी मुस्लिम संघाला ६२ धावांवरच रोखले. विजयाचे हे लक्ष्य अवर्स क्रिकेट क्लबच्या कौस्तुभ कदमने (२८) आणि तनिष मेहेरने (३०) नाबाद ६३ धावांची अर्धशतकी भागीदारी करत पार केले.

संक्षिप्त धावफलक : मांडवी मुस्लिम : २८.३ षटकात सर्वबाद ६२ ( शंकर बालसुब्रमण्यम १६, प्रणव टिल्लू १२, आशिष वायंगणकर ५.३ -३- ५- ४, भार्गव पाटील ८-१-१८-३) १० विकेट्सनी पराभूत विरुद्ध अवर्स क्रिकेट क्लब : ८ षटकात बिनबाद ६३ ( कौस्तुभ कदम नाबाद २८, तनिष मेहेर ३०).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!