ताज्या घडामोडी

यावल तालुक्यतील भुरट्या चोरांना आळा घालण्यासाठी गावोगावी ग्रामसुरक्षदल व रात्री ची गस्त वाढविण्याची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

Spread the love

कोरपावली ता यावल वार्ताहर फिरोज तडवी, कोरपावली गावात नुकत्याच बंद घराचे कुलूप तोडून रोकड सह सत्तर हजाराचा ऐवज लंपास झाल्याने व वारंवार शेतकऱ्यांच्या विजपपंचा पुरवठा करणाऱ्या केबलची चोरी1 होण्याच्या घटना यावल तालुक्यात वारंवार मोठया प्रमाणावर घडत असून याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली, यावल तालुक्यातील अनेक गावात आणि शेतात घरफोडीचे तसेच, शेतकऱ्यांची विद्युत केबल चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले असून यावल पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याकामी तसेच चोरट्यांना लगेच तात्काळ चौकशी करून अटक करावी अशी मागणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) साहेब डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस सेवा फौंडेशन जलीलदादा पटेल,रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दामसेठ शाह, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांनी केली आहे सदर भेटीत लवकरात लवकर चौकशीचे आदेश देऊन चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलीस निरीक्षक यांना देण्याचे आश्वासन दिले तसेच जिल्ह्यात चोऱ्या व घरफोडया रोखण्यासाठी ग्रामसुरक्षादल रात्रीची गस्त म्हणून स्थापन करण्याची संकल्पना पूर्वपदावर असल्याचे सदर भेटीत आश्वाशीत केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!