आरोग्य व शिक्षण

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा 

Spread the love

मुंबई :  2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवण्याचा ठपका ठेवत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे.

भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यावर चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती.याविरोधात अमरावती अचलपूर येथील भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने या खटल्याचा आज निकाल देत बच्चू कडू यांना कारावासाची शिक्षा सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!