आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कामगार ह.भ.प.हरिश्चंद्र केदारी यांचा सपत्निक सत्कार संपन्न.

Spread the love

सेवानिवृत्त कामगार ह.भ.प.हरिश्चंद्र केदारी यांचा सपत्निक सत्कार संंपन्न.                                                                    करताना वैराग्यमुर्ती ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले , शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , तुकाराम गायकवाड , नंदकुमार भसे ,विलासभाऊ बडेकर , सुखदेव ठाकर , पांडुरंग गायकवाड आदी मान्यवर
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे,उदास विचारे वेच करी , । । या प्रमाणे मनुष्याचे वर्तन असावे : वैराग्यमुर्ती ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले
आवाज न्यूज:लोणावळा ता.१८(प्रतिनिधी ) जोडोनिया धन उत्तम व्यवहारे,उदास विचारे वेच करी , । । या संत विचाराप्रमाणे मनुष्याचे वर्तन असावे. असे वैराग्यमुर्ती ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले यांनी कीर्तनामधे प्रतिपादन केले. सुमारे पस्तीस वर्षे सेवेनंतर आया एन एस शिवाजी मधून सेवानिवृत्तीनिमित्त ह.भ.प. हरिश्चंद्र गोपाळ केदारी यांचा प्रवचन, हरिपाठ व कीर्तनाचे कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला.
वैराग्यमुर्ती ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आय एन एस शिवाजी मधील अधिकारी , कामगारनेते , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे , मावळ तालुका दिंडी समाजाचे व नवमी भजनी मंडळाचे पदाधिकारी व टाळकरी , वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरवंडे येथे श्री कोराई देवी मंदिराचे प्रांगणात झालेल्या या कीर्तनात ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले यांनी ” , जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । । या अभंगावर सुश्राव्य असे कीर्तन केले. यावेळी जगद्गुरू संत तुकोबाराय यांचे अभंगाप्रमाणे लोकांनी उत्तम काम , योग्य प्रामाणिक , सचोटीने व्यवसाय वा नोकरी करून धन , पैसा मिळविला , तर ते संसार सुखी करतील.
वाममार्गाने मिळविलेले धन लाभदायक ठरत नाही. लोकांनी नितीने चालले पाहिजे , नीतीने व्यवहार करावा , जीवन सुफळ होते. केदारी बुवांचा समाजात आदर्श घ्यावा.
वारकरी आणि पंढरीच्या पांडुरंगावर अपार निष्ठा आसणारे ह.भ.प.हरिश्चंद्रजी गोपाळ केदारी हे पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे.त्यांचेकडील समाजासाठी आणखी चांगली सेवा , विठ्ठलाची भक्ती घडावी , त्यांनी कामामधून सेवानिवृत्त होताना आता पायी पंढरीची वारी आनंदाने करावी , त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ! यावेळी आय एन एस मधील कामगारनेते मोरेश्वर मातेरे म्हणाले , वारकरी , शेतकरी आणि कामगार यांची सेवा कशी असावी , तर प्रामाणिक आणि निष्ठावंत अशी असावी , हा आदर्श ह.भ.प.हरिश्चंद्र केदारी बुवा यांनी घालून दिला. ही शेवटची पिढी आयएनएसमधे सेवानिवृत्त होत असून यानंतर काही तरूणांची भरती होणे गरजेचे असून या गावातील बेरोजगार तरूणांचा उदरनिर्वाह कसा चालणार ? हा भविष्यात प्रश्न आहे ! व्यक्ती व्यक्ती जमवून भवती , । जागृत करणे तयाप्रती । । नको कीर्ती , नकोच पावती । । वारकरी हीच माझी शक्ती आणि भक्ती , , हे हरिश्चंद्रजी केदारी बुवा यांचेबद्दल म्हणावे लागेल. कार्यक्रमाला इतकी माणसे जमली , ही त्यांचे कामाची पोचपावती आहे., यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच माजी पोलिसपाटील सौ.ताराबाई हरिभाऊ कडू यांनीही शुभेच्छा दिल्या . , मृदूंगमणी भिवाजी गायखे , श्रीहरी घनवट यांनी साथसंगत केली.
कीर्तनकार ह.भ.प पांडुरंग गायकवाड , सुभाषमहाराज पडवळ, सुखदेव ठाकर , विणेकरी धोंडिबा विकारी , राजाराम विकारी , रोहिदास खांडेभरड , माऊली जांभूळकर , कामगारनेते जितेंद्र राऊत, माजी सैनिक मारूती केदारी , माजी सदय्य अनिल केदारी , भाऊ जांभूळकर , शाम मातेरे , उद्योजक सुरेश ह.कडू, माधव राऊत, काळूराम वाडेकर , नाथामहाराज शेलार, मावळ तालुका दिंडी समाज खजिनदार अशोकराव राऊत,सहसेक्रेटरी विकास खांडभोर , मावळ तालु वारकरी सांप्रदाय मंडळ सचिव रामदास पडवळ , बजरंग घारे , शिवाजी आगिवले , शांताराम गायखे , , सोमनाथ सावंत, कामगारनेते ज्ञानेश्वर जांभूळकर , माजी सरपंच कुसूमताई जांभूळकर , संभाजी हुलावळे , ठकाजी मोरे , , बळवंत येवले , पवनकुमार दड्डवाल, सखाराम काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सेवानिवृत्त कामगार हरिश्चंद्र गोपाळ केदारी आणि सौ.कमलताई हरिश्चंद्र केदारी या दांपत्याचे विठ्ठल रूक्मिणी मुर्ती व ज्ञानेश्वरी देवून ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले यांचेकडून व मान्यवरांनी स्वागत व सत्कार करण्यात आला. आयोजन शिवाजी हरिश्चंद्र केदारी यांनी केले.यावेळी वामन भालेकर, विक्रम वाडेकर , कामगारनेते मोरेश्वर मातेरे , सुभाषमहाराज पडवळ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजाराम शिंदे , मावळ तालुका दिंडी समाजचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड , माजी अध्यक्ष नरहरी केदारी , विणेकरी भाऊ टाकळकर , बजरंग तांबोळी , गणेश काजळे , भिमाजी भानुसघरे , सदाशिव विकारी , किसन मराठे, भगवान पडवळ , सरपंच अनिता दिलीप कडू, उपसरपंच सुप्रिया हरिष पडवळ, सदस्य अविनाश जांभूळकर , विशाल कडू, निलेश पनीकर, सचिन मारूती कडू , पोलिसपाटील प्रीतम ससाणे , तसेच भगवान पडवळ आदी उपस्थित होते. सूञसंचालन विकास खांडभोर यांनी केले आभार सुभाषमहाराज पडवळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!