आरोग्य व शिक्षण

स्वच्छ सर्वेक्षण मधे तुंगार्ली प्रभाग आणि हाॕटेलमधे फरियाज प्रथम क्रमांकाचे मानकरी

Spread the love

लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण मधे तुंगार्ली प्रभाग आणि हाॕटेलमधे फरियाज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले . दुसरा क्रमांक वलवण प्रभागाने मिळविला ;तर भांगरवाडी प्रभाग तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरला. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विजयी झालेल्या प्रभागात त्या त्या प्रभागाचे नगरसेवक व नगरसेविका यांनी प्रशस्तिपञके स्विकारली.तसेच हाॕटेलमधे बक्षिसे मिळविणारे व्यवस्थापक यांचेकडून प्रशस्तिपञके स्विकारण्यात आली.

.

ता.१० रोजी अखेरच्या दिवशी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे , नगरसेविका बिंद्रा गणाञा , भाजपचे गटनेते देविदास कडू , आरोग्य समिती तत्कालीन सभापती रचना सिनकर , जेष्ठ माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , नगरसेवक ललीत सिसोदिया तसेच मागासवर्गीय कल्याण समिती सभापती मंदा सोनवणे तसेच तत्कालीन नगरसेवक राजू बच्चे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री.पुजारी , श्रीमती सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्री.दामोदरे , आरोग्य समिती सभापती सौ.सिनकर , स्वच्छ सर्वेक्षण चे काम करणाऱ्या सौ.तावरे , सौ.सोनाली सासवडे , स्वच्छ सर्वेक्षण मधील चांगले काम करणाऱ्या सर्व आधिकरी व कामगार यांचा प्रशस्तिपञके देवून गौरव करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!