आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मावळातील सावित्रींच्या लेकींची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकलींचे वाटप !!!                                                                                                                                          

लायन्स क्लब ऑफ पूणे सेलिब्रेशनस व मेडीजैन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलीना नवीन २५ सायकलींचे वाटप.

Spread the love

मावळातील सावित्रींच्या लेकींची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकलोंचे वाटप !!! 

“लायन्स क्लब ऑफ पूणे” सेलिब्रेशनस व मेडीजैन ट्रस्ट” यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलीना नवीन २५ सायकलींचे वाटप. 
                                                                               आवाज न्यूजः कामशेत प्रतिनिधी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजगाव येथील सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप करण्यात आले. या लेकींना शिक्षण घेण्यासाठी दररोज पाच किलोमीटर पायी जावे लागत होते.या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट ३२३४डी२ चे सामाजिक कार्यकर्ते व झोन चेअरपर्सन लायन भरत इंगवले यांच्या पुढाकार घेऊन लायन्स क्लब ऑफ पूणे सेलिब्रेशनस व मेडीजैन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलीना नवीन २५ सायकल देऊन पायपीट थांबवली. मुलींच्या चेहऱ्यावर ओसांडून आनंद वाहत होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास पालक,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तत्पूर्वी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या तालावर वाजत गाजत स्वागत केले. यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन शैलजा सांगळे, झोन चेअरपर्सन लायन भरत इंगवले, युवानेते नितिनशेठ इगवले,प्रेसिडेंट लायन जितेंद्र ठोंबरे, सेक्रेटरी लायन् पद्मजा कदम, खजिनदार लायन सीमा ठोंबरे, व्हाईस प्रेसिडेंट गूरूपरसाद कनोजिया, लायन्स कलबचे नवनिर्वाचित सभासद व सविता इंगवले, विश्वास कामठे, अतुल दळवी,चंद्रकांत दरेकर, मेडीजैन ट्रस्ट चे चेअरमन डॉक्टर संदीप लूणावत, प्रेसिडेंट डॉ. पराग जैन सेक्रेटरी डॉ निलेश कटारिया, खजिनदार डॉ. किशोर जैन त्याप्रमाणे मेडीजैन ट्रस्ट चे सभासद व नीता लूणावत, सरपंच दिपाली साबळे, पोलीस पाटील राजश्री तंबोरे ,ग्रामपंचायत सदस्य महादू शेडगे, श्रीरंग गोडे, कौशल्या पवार, उज्वला पोटफोडे, ममता सोरकाते, दत्ता शेठ कुटे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ शिंदे, तंटामुक्ती उपाध्यक्ष काळूराम भालसिंग, संतोष असवले, माजी सरपंच रवींद्र शेलार, उपसरपंच माजी उपसरपंच बजाबा हिले , शरद सोरकाते, शिवाजी पवार, संदीप कुटे, संदीप कुटे, संतोष भालशिंगे, हरिभाऊ मोरमारे, रवींद्र पवार सर्व व्यवस्थापन समिती सदस्य आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच, दूध विकास सोसायटीच्या चेअरमन मंदाबाई कुडले शाळेतील सर्व स्टाफ ग्रामस्थ इत्यादी असे बहुसंख्येने उपस्थित होते.

 

झोन चेअरपर्सन लायन भरत इंगवले म्हणाले, “लायन्स क्लब मार्फत दरवर्षी ग्रामीण भागातील मुलीसाठी ५१ सायकल देत असतो आणि त्या सायकल एक वर्षा नंतर परत दुरूस्त पण करून दिल्या जातात व त्याचा खर्च पण क्लब मार्फत केला जातो. सायकल पट्टू नारायण मालपोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निवृत्त मुख्याध्यापिका अरूणा सोनवणे मॅडम यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शाळेतील मुलीना सायकल मिळणे कामी मावळ ता राष्टवादी काँग्रेसचे संघटन सरचिटणीस रामदास वाडेकर व
उपसरपंच नवनाथ ठाकर यांनी पुढाकार घेतला व परिश्रम घेतले. याबद्दल पालकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मावळ तालुका निवेदक संघाचे सदस्य योगेश बबनराव माझिरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!